अखेर ऐश्वर्या राय हिला अत्यंत मोठा दिलासा, तो दावा फेटाळला, तब्बल 4 कोटी…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ऐश्वर्या रायने मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला असून मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्याला नुकताच मोठा दिलासा मिळाला.

अखेर ऐश्वर्या राय हिला अत्यंत मोठा दिलासा, तो दावा फेटाळला, तब्बल 4 कोटी...
Bollywood actress Aishwarya Rai
| Updated on: Nov 07, 2025 | 12:04 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. मात्र, मागील काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि तिच्या नात्याबद्दल सध्या विविध चर्चा रंगत आहेत. त्यामध्ये ऐश्वर्याला मुंबईतील आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने (ITAT) मोठा दिलासा दिला. 31 ऑक्टोबर 2025 रोजीच्या निर्णयात न्यायाधिकरणाने कर विभागाचा 4.11 कोटी रुपयांचा अतिरिक्त कर रद्द केला. हा मोठा दिलासा ऐश्वर्या रायला म्हणावा लागेल. मागील काही दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत होते. 2022-23 च्या कर निर्धारण वर्षाशी संबंधित आहे.  कलम 14अ अंतर्गत करमुक्त उत्पन्नाशी संबंधित खर्चावरून मोठा वाद सुरू होता. शेवटी निकाल ऐश्वर्याच्या बाजूने लागल्याचे बघायला मिळाले.

ऐश्वर्या राय हिला अत्यंत मोठा दिलासा

ऐश्वर्या राय हिने 2022-23 च्या अंदाजपत्रकासाठी एकूण 39.33 कोटी उत्पन्न जाहीर केले. 31 मार्च 2021 पर्यंत, त्यांच्याकडे 449 कोटी रुपयांचे करमुक्त उत्पन्न देणारी गुंतवणूक होती, ज्यामुळे 2.14 कोटी रुपयांचे सूट उत्पन्न मिळाले.  AO ने नियम 8D अंतर्गत सरासरी गुंतवणूक मूल्याच्या 1% अर्थात 460 कोटी रुपये परवानगी नाकारली. यामुळे ऐश्वर्याचे उत्पन्न 43.44 कोटी झाले. 16 मार्च 2024 रोजी कलम 143(3) अंतर्गत हा आदेश अंतिम झाला.

ऐश्वर्या रायने केले होते  CIT(A) कडे अपील 

त्यानंतर ऐश्वर्या राय हिने CIT(A) कडे अपील केले आणि तिथे 16 जून 2025 रोजी अतिरिक्त परवानगी रद्द करण्यात आली.विभागाने आयटीएटीकडे अपील केले. 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान 31 ऑक्टोबर रोजी निर्णय देण्यात आला. न्यायिक सदस्य पवन सिंह आणि लेखापाल सदस्य रेणू जोहरी यांच्या खंडपीठाने एओची अतिरिक्त परवानगी नाकारणे निराधार आहे, असे स्पष्टपणे म्हटले.

29 ऑक्टोबर रोजी महत्वाची सुनावणी 

एकप्रकारे मोठा दिलासा ऐश्वर्या राय हिला मिळाला. ऐश्वर्या राय बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असून मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्याने आपले पैसे अनेक ठिकाणी गुंतवले आहेत. ऐश्वर्याची मुंबईत मोठी संपत्ती आहे. बच्चन कुटुंबियांसोबत ऐश्वर्या जलसा बंगल्यात राहते. आता ऐश्वर्याला या प्रकरणात खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळालाय. विदेशात देखील ऐश्वर्याची संपत्तीची असल्याची माहती मिळतंय.