
मागील काही दिवसांपासून बच्चन कुटुंबियांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय ही चांगलीच चर्चेत आहे. ऐश्वर्याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. विशेष बाब म्हणजे बच्चन कुटुंबियांची सून झाल्यानंतरही ती चित्रपटांमध्ये धमाल करताना दिसली. 2007 मध्ये ऐश्वर्याने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा लेक अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे बॉलिवूडचे हे लग्न सर्वात जास्त चर्चेत असणारे ठरले. अनेक नाट्यमय घडामोडी या लग्नादरम्यान घडल्या. अनेकांचे स्वप्न तुटली होती. सर्वकाही सुरळीत सुरू असताना मागील काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची सतत चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, घटस्फोटाच्या चर्चांवर कोणीही भाष्य करण्यास तयार नाहीये.
ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत कायमच स्पॉट होताना दिसते. बच्चन कुटुंबियांच्या सदस्यांसोबत फार कमी वेळा ती दिसते. ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्या नात्याबद्दल कायमच विविध चर्चा रंगताना दिसतात. जया बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर स्पष्टपणे बोलताना ऐश्वर्या राय ही दिसली आहे. पहिल्यांदाच तिने जया बच्चन आणि आपले नाते कसे आहे, यावर भाष्य केले.
ऐश्वर्या राय म्हणाली की, त्याची आई (जया बच्चन) माझ्यासाठी आईसारखी आहे आणि ज्या पद्धतीने मला स्वीकारण्यात आले आणि प्रेम देण्यात आले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे… पहिल्यांदाच जया बच्चन यांच्यासोबतच्या नात्यावर ऐश्वर्या राय लग्नाच्या अगोदर बोलताना दिसली. मात्र, ऐश्वर्या राय हिने जुन्या एका मुलाखतीमध्ये जया बच्चन यांच्याबद्दल हे विधान केले होते. या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन देखील उपस्थित होता.
फक्त जया बच्चन याच नाही तर सासरे अमिताभ बच्चन यांच्याबद्दलही बोलताना ऐश्वर्या राय ही दिसली होती. शक्यतो आपल्या काैटुंबिक गोष्टींबद्दल बोलताना ऐश्वर्या फार काही दिसत नाही. मात्र, तिने पहिल्यांदाच सासू जया बच्चन यांच्याबद्दल भाष्य केले होते. ऐश्वर्या राय हिने लग्नानंतरही अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच विदेशात ती एका पुरस्कार सोहळ्यासाठी देखील पोहोचली होती.