
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या तूफान चर्चेत आहे. आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला ऐश्वर्या राय उपस्थित होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री मंचावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पहिल्यांदाच ऐश्वर्या मंचावर दिसली. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने जाती धर्मावर यादरम्यान मोठे विधान केले.
ऐश्वर्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाय पडून आर्शिवाद घेताना दिसली. आता ऐश्वर्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. लोक ऐश्वर्याचे काैतुक करताना दिसत आहेत. सासू जया बच्चन कायमच भाजपावर टीका करताना दिसतात. मात्र, सून ऐश्वर्या नरेंद्र मोदींचे आर्शिवाद घेताना दिसली.
ऐश्वर्या राय हिने म्हटले की, फक्त एकच जात आहे, ती म्हणजे मानवतेची जात… फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे प्रेमाचा धर्म… फक्त एकच भाषा आहे, ती म्हणजे हृदयाची भाषा आणि फक्त एकच देव आहे… जे सर्वत्र आहे. पुढे ऐश्वर्या राय हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत म्हटले की, पीएम नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून आभार मानू इच्छिते की, कारण ते आमच्यासोबत इथे समारोहात पोहोचले.
नरेंद्र मोदी यांनी इथे पोहोचून कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी त्यांचे प्रेरणादायी शब्द ऐकण्यासाठी उत्सुक आहे. तुमची उपस्थिती या जन्मशताब्दी सोहळ्याला अधिक पवित्र आणि खास बनवत आहे. पुढे ऐश्वर्या म्हणाली की, आपल्याला स्वामींच्या संदेशाची आठवण करून देते की खरे नेतृत्व म्हणजे सेवा मानवतेची सेवा करणे ही देवाची सर्वात मोठी सेवा आहे, असेही ऐश्वर्या रायने म्हटले.
VIDEO | Puttaparthi, Andhra Pradesh: Actor Aishwarya Rai Bachchan touches feet of PM Modi during the birth centenary celebrations of Sri Sathya Sai Baba.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/bciaDVyAlu
— Press Trust of India (@PTI_News) November 19, 2025
यानंतर भाषण करून आपल्या जाग्यावर बसण्याच्या अगोदर ऐश्वर्या राय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ पोहोचते आणि त्यांच्या पाय पडते. ऐश्वर्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत असून तिचे काैतुक करत आहेत. जया बच्चन यांना टार्गेट करत काहींनी म्हटले की, सूनेकडून संसार शिकण्याची वेळ सासूवर आलीय.