ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली अनन्या पांडे, थेट अंबानी कुटुंबाच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीसोबतच…
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. विशेष म्हणजे अनन्या पांडे हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अनन्या पांडे हिच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळत नाहीये. अनन्या पांडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

चंकी पांडेची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांपासून अनन्या पांडे ही अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत होती. हेच नाही तर यांचे विदेशातील काही फोटोही व्हायरल होताना दिसले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे ब्रेकअप झाले. हेच नाही तर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. यावेळी अनन्या पांडे ही चक्क हार्दिक पांड्या याच्यासोबत धमाल करताना दिसली. अनन्या पांडे ही हार्दिक पांड्याला डेट करत असल्याचे सांगितले जातंय.
हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे यांचे नाव चर्चेत असताच आता अनन्या पांडे हिचे नाव एका खास व्यक्तीसोबत जोडले जातंय. वॉकर ब्लॅंको याच्यासोबत अनन्या पांडेचे नाव जोडले जातंय. विशेष म्हणजे वॉकर ब्लॅंको हा अंबानी कुटुंबियांच्या अत्यंत जवळचा आहे. वॉकर ब्लॅंको हा गुजरातच्या जामनगरमध्ये राहतो.
वॉकर ब्लॅंको (walker blanco) आणि अनन्या पांडे यांची पहिली भेट ही अनंत अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये झाली. तेंव्हापासून दोघे एकमेकांचे खास बनले आहेत. हेच नाही तर दोघे अनेक तास फोनवर बोलत असल्याचेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. दोघांमध्ये स्पेशल कलेक्शन तयार झाल्याचे सांगितले जातंय.
दोघे सध्या एकमेकांना समजून घेत आहेत. वंतारा पार्कमध्ये वॉकर ब्लॅंको हा अंबानी कुटुंबासाठी काम करतो. गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा आहेत की, अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. मात्र, यावर अनन्या पांडे किंवा आदित्य रॉय कपूर यांनी काहीच भाष्य केले नाहीये. मात्र, काही दिवसांपूर्वीच आदित्य रॉय कपूर आणि चंकी पांडे यांचे फोटो व्हायरल होताना दिसले.
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे प्रत्येक पार्टीमध्ये एकत्र सहभागी होत. आता दोघे कुठेही स्पॉट होताना दिसत नाहीत. मात्र, आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांचे ब्रेकअप नेमके कोणत्या कारणाने झाले हे कळू शकले नाहीये. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे हिने मुंबईमध्ये अत्यंत महागडे घर खरेदी केले आहे.
