नाही दिले पैसे…, काढून घेतलं क्रेडिट कार्ड, हृतिक रोशनच्या बहिणीचे कोणी केले असे हाल?
Hrithik Roshan Sister: हृतिक रोशनच्या बहिणीच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला नाही माहिती..., दोन अपयशी लग्न, नाही दिले पैसे..., काढून घेतलं क्रेडिट कार्ड... कोणी केले अभिनेत्याच्या बहिणीचे असे हाल?

Hrithik Roshan Sister: बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर राकेश रोशन यांनी दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. अनेक हीट सिनेमांचं दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केलं. वडिलांनंतर अभिनेता हृतिक रोशन याने देखील बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. पण राकेश रोशन यांची मुलगी सुनैना रोशन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंच नाही. पण सुनैना तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत राहिली.
सुनैना, हृतिक याची मोठी बहीण आहे. सुनैना हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने दोन वेळा लग्न केलं. पण तिचे दोन्ही लग्न अपयशी ठरले. शिवाय तिने अनेक अजारांचा देखील सामना केलं. एवढंच नाही तर, एकेकाळी सुनैनाला दारूचे व्यसन जडलं होतं. तिने खूप दारू प्यायला सुरुवात केली होती.
सतत दारु पित असल्यामुळे आई – वडिलांनी तिला पैसे देणं देखील बंद केलं. शिवाय तिच्याकडे असलेले क्रेडिट कार्ड देखील काढून घेतलं. अखेर सुनैना हिने आयुष्यातील काही दिवस पुनर्वसन केंद्रात घालवले. नुकताच झालेल्या मुलाखतीत सुनैना हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
View this post on Instagram
मुलाखतीत सुनैना म्हणाली, “दारूचे व्यसन हे असं आहे की आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. जेव्हा मी कठीण परिस्थितीत होते तेव्हा मला काहीही कळत नव्हतं. म्हणूनच मी दारू प्यायचे पण तो काळ सर्वात वाईट होता. मी पलंगावरून पडले आणि खुर्चीवरूनही घसरले. मला दुखापत झाली तो काळ माझ्यासाठी कठीण होता. अशा परिस्थितीत तुम्ही जास्त दारू प्यायला सुरुवात करता.’
पुढे सुनैना म्हणाली, “माझ्या आई – वडिलांनी माझं क्रेडिट कार्ड काढून घेतलं. त्यांनी मला पैसे देणेही बंद केले कारण मी ते दारूवर खर्च करायचे. याशिवाय सुनैनाला अशा मैत्रिणींना भेटण्यापासूनही रोखण्यात आले जे तिच्यासाठी दारूची व्यवस्था करू शकतील.