AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ileana D’cruz | लग्नविना एका मुलाची आई झाली इलियाना

अभिनेत्री इलियाना हिने दिला गोंडस मुलाला जन्म; लेकाचा पहिला फोटो शेअर करत केली नावाची घोषणा... सध्या सर्वत्र इलियाना डिक्रुझ हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Ileana D’cruz | लग्नविना एका मुलाची आई झाली इलियाना
| Updated on: Aug 06, 2023 | 7:56 AM
Share

मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री इलियाना डिक्रुझ तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत स्वतःबद्दल चाहत्यांना माहिती द्यायची. आता देखील जीवनातील आनंदाची बातमी अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. इलियाना हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने लेकाचा पहिल्या फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सध्या सर्वत्र इलियाना आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे. अलियाना हिने १ ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला.

पहिल्यांदा आई झाल्यानंतर आनंत व्यक्त करत इलियाना म्हणाली, ‘आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपूरे आहेत. मुलाचं जगात स्वागत केल्यामुळे आम्ही प्रचंड आनंदी आहोत…’ असं अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

एवढंच नाही तर, इलियाना डिक्रूझने तिच्या मुलाच्या नावची देखील घोषणा केली आहे. इलियाना हिने तिच्या बाळाचं नाव ‘कोआ फिनिक्स डोलन’ असं ठेवलं आहे. इलियानाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करताच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

अभिनेत्री अथिया शेट्टी, हुमा कुरेशी, डब्बू रतनानी, नर्गिस फाखरी आणि सोफी चौधरी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हृदयाच्या इमोजीसह इलियाना हिला शुभेच्छा आणि बाळाला आशीर्वाद दिले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्रीचा मुलागा प्रचंड क्यूट दिसत आहे.

सांगायचं झालं तर, एप्रिलमध्ये इलियाना डिक्रूझने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. लग्नाआधी गरोदर राहिल्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं. पण इलियाना हिने बाळाच्या वडिलांबद्द अद्यापही मौन बाळगलं आहे. पण इलियाना तिच्या गरोदरपणात सोशल मीडियावर जोडीदाराचा फोटो पोस्ट करत कौतुक केले होतं.

इलियाना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इलियाना हिने अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘बर्फी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता बॉलिवूडपासून दूर असली तर, सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.