
अभिनेत्री सारा अली खान, अनन्या पांडे आणि जान्हवी कपूर यांनी जवळपास एकदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. फार कमी वेळात तिघींनी देखील झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आज सारा, अनन्या आणि जान्हवी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनय, सौंदर्य आणि स्टाईलमुळे अभिनेत्री कायम चर्चेत असतात. सारा, अनन्या, जान्हवी फक्त त्यांच्या प्रोफशेनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. अशात तिघींमध्ये कोणती अभिनेत्री अधिक श्रीमंत आहे… अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये रंगलेली असते.
तिघींमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सर्वांत आधी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ सिनेमातून जान्हवीने करियरला सुरुवात केली. तिच्यानंतर अभिनेत्री सारा अली खान हिने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात सारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत दिसली. तर अनन्या पांडे हिने 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
सारा अली खान हिला ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ सिनेमातून भरभरुन प्रेम मिळाल. त्यानंतर सारा ‘लव्ह आज कल’ आणि ‘कुली’ सिनेमात दिसली. पण अभिनेत्रीचे तिनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. आता सारा ‘मेट्रो इन दिनों’ सिनेमामुळे चर्चेत आहे. चाहते देखील साराच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.
कायम चर्चेत असणाऱ्या सारा हिच्या नेटवर्थची देखील चर्चा रंगलेली असते. रिपोर्टनुसार, सारा एका सिनेमासाठी जवळपास 3 कोटी रुपये चार्ज करते. कोणत्या जाहिरातीसाठी अभिनेत्री 1 कोटी रुपये मानधन घेते. तर इन्स्टाग्राम पोस्टसाठी सारा 35 लाख रुपये घेते. एवढंच नाही तर, मुंबईत अभिनेत्रीचं आलिशान घर देखील आहे. ज्याची किंमत तब्बल 1.5 कोटी रुपये आहे. सारा हिची नेटवर्थ 41 कोटी रुपये आहे.
जान्हवी कपूर हिच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, अभिनेत्रीकडे 82 कोटींची संपत्ती आहे. एका सिनेमासाठी जान्हवी 5 कोटी रुपये घेते. तर जाहिरातीसाठी अभिनेत्री 2 – 3 कोटी रुपये घेते. अभिनेत्रीकडे स्वतःचं घर देखील आहे. त्या घराची किंमत 39 कोटी रुपये आहे.
अनन्या पांडे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री एका सिनेमासाठी 3 कोटी मानधन घेते. कोणत्या जाहिरातीसाठी अभिनेत्री 60 लाख रुपये मानधन घेते. तर इन्स्टाग्राम पोस्टसाठी अभिनेत्री 50 लाख रुपये मानधन घेते. अभिनेत्रीकडे BMW 7 Series, Range Rover Sport, Mercedes Benz E Class सारख्या आलिशान गाड्या आहेत. रिपोर्ट्सनुसार अनन्याची एकूण संपत्ती 74 कोटी रुपये आहे.