AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रजनीकांत स्टारर ‘जेलर’ मधील अभिनेता पोलिसांच्या ताब्यात, दारूच्या नशेत विमानतळावर गोंधळ

Vinayakan TK Detained: दारुच्या नशेत प्रसिद्ध अभिनेत्याने विमानतळावर घातला गोंधळ, सुपरस्टार रजनीकांत स्टारर 'जेलर' सिनेमातील अभिनेता पोलिसांच्या ताब्यात, अभिनेत्याच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता...

रजनीकांत स्टारर 'जेलर' मधील अभिनेता पोलिसांच्या ताब्यात, दारूच्या नशेत विमानतळावर गोंधळ
| Updated on: Sep 08, 2024 | 12:43 PM
Share

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सुपरस्टार रजनीकांत यांसारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत काम केलेल्या अभिनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दाक्षिणात्य अभिनेता विनायकन टीके याने मद्यधुंद अवस्थेत विमानतळावर गोंधळ घातल्याची माहिती सध्ये समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना अभिनेत्याला अटक केली आहे. सांगायचं झालं तर, अभिनेता विनायकन टीके याने रजनीकांत यांच्या ‘जेलर’ सिनेमात खलनायकाच्या भूमिका न्याय दिलं.

विमानतळावर विनायकन टीके याची सीआयएसएफ यांच्यासोबत देखील वाद झाले. वाद वाढल्यानंतर अभिनेत्याला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अटक केली आहे. अटक केल्यानंतर अभिनेत्याला पोलिसांकडे सोपावण्यात आलं. आता याप्रकरणी पुढे काय होत? या प्रतीक्षेत प्रत्येक जण आहे. याप्रकरणी आता पुढील कारवाई हैदराबाद पोलीस करणार आहे.

मद्यधुंद अवस्थेत विमानतळावर गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी विनायकन टीकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. याप्रकरणी त्याची कसून चौकशी केली जाईल. त्यानंतर पोलीस पुढील कारवाई करतील.

विमानतळासारख्या सार्वजनिक ठिकाणी विनायकन टीके याच्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे आजूबाजूला उपस्थित असलेले लोकही हैराण झाले. प्रकरण अधिक वाढू नये म्हणून सीआयएसएफने विमानतळावरच त्याला ताब्यात घेतले. यानंतर अभिनेत्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

विनायकन टीके याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘जेलर’ सिनेमात अभिनेत्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेता स्मगलरच्या भूमिकेत दिसला. विनायक याने 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘मांथ्रिकम’ सिनेमातून अभिनयाची सुरुवात केली. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्याला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. विनायकन फक्त अभिनेता नााही तर, गायक आणि म्यझिक कंपोजर देखील आहे.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.