जया बच्चन यांच्यावर भडकले जगदीप धनखड, थेट म्हणाले, तुम्ही सेलिब्रिटी असले म्हणून काय…

बॉलिवूड अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन नेहमीच चर्चेत असतात. कायमच जया बच्चन यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या जया बच्चन यांचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.

जया बच्चन यांच्यावर भडकले जगदीप धनखड, थेट म्हणाले, तुम्ही सेलिब्रिटी असले म्हणून काय...
Jaya Bachchan and Jagdeep Dhankhad
| Updated on: Aug 09, 2024 | 3:08 PM

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जया बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया बच्चन या त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. जया बच्चन बॉलिवूडसोबतच राजकारणात देखील सक्रिय आहेत. जया बच्चन यांचे अधिवेशनातील अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र, जया बच्चन यांच्याबाबत राज्यसभेत पुन्हा एकदा गदारोळ झाला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जया बच्चन या सभापती जगदीप धनखड यांच्यासोबत बोलताना दिसत आहेत. 

जया बच्चन म्हणाल्या की, सर मी जया अमिताभ बच्चन हे बोलू इच्छिते की, मी कलाकार आहे…बॉडी लॅंग्वेज नक्कीच समजते…यासोबतच एखाद्याचे हावभाव देखील समजते…तुमचे हे बोलणे सहन करण्यासारखे नाही…सर, भलेही तुम्ही खुर्चीवर बसलेले आहेत…जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून हंगामा होताना दिसला.

यावेळी सभापती जगदीप धनखड यांनीही जया बच्चन यांना जोरदार उत्तर दिल्याचे बघायला मिळतंय. जगदीप धनखड म्हणाले की, जया जी तुम्ही खूप जास्त सन्मान कमावला आहे…एका अभिनेत्याचा आणि डायरेक्टरचा एक विषय असतो. तुम्ही ते नाही बघितले…जे मी इथे बसून बघितले आहे…तुम्ही कोणी पण असाल…तुम्ही सेलिब्रिटी का असेना…तुम्हाला डेकोरम समजावे लागेलच…

पुढे जगदीप धनखड म्हणाले की, मी हे सहन करणार नाहीये…कधीच याचा विचार करू नका की, तुमचा सन्मान आहे…आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. यापूर्वीच जगदीप धनखड आणि जया बच्चन यांचे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसले होते. एका व्हिडीओमध्ये तर दोघे हसताना देखील दिसत होते. 

काही दिवसांपूर्वीच जया बच्चन यांना जया अमिताभ बच्चन या नावाने बोलण्यात आले होते. त्यावेळी संताप व्यक्त करत जया बच्चन यांनी म्हटले होते की, एका महिलेची तिच्या पतीच्या नावाच्या व्यतिरिक्तही तिची एक वेगळी ओळख असते. जया बच्चन या नात नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये देखील नेहमीच मोठे खुलासे करताना दिसतात.