AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन यांनी दिले ट्रोलर्सला ओपन चॅलेंज, म्हणाल्या, हिंमत असेल तर आता..

जया बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर राजकारणातही चांगल्याच जया बच्चन सक्रिय असतात. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

जया बच्चन यांनी दिले ट्रोलर्सला ओपन चॅलेंज, म्हणाल्या, हिंमत असेल तर आता..
| Updated on: Feb 29, 2024 | 2:19 PM
Share

मुंबई : जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. विषय कोणत्याही असो जया बच्चन आपले मत मांडताना फार काही विचार करत नाहीत. जया बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अभिनयासोबतच जया बच्चन या राजकारणात देखील चांगल्याच सक्रिय दिसत आहेत. जया बच्चन यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या व्हिडीओमध्ये त्या पापाराझी यांनी खडेबोल सुनावताना अनेकदा दिसल्या आहेत. जया बच्चन रोखठोक बोलताना दिसतात.

नुकताच आता जया बच्चन या नात नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये पोहचल्या. यावेळी अनेक विषयांवर जया बच्चन यांनी भाष्य केले. नव्या हिचा हा शो चांगलाच चर्चेत दिसतोय. नव्या हिचा भाऊ अगस्त्य नंदा हा या शोमध्ये पोहचला होता. यावेळी अगस्त्य हा थेट डिप्रेशनबद्दल बोलताना दिसला आणि त्याने आपण किती जास्त वाईट काळातून गेल्याचे देखील सांगितले.

आता नुकताच शोमध्ये जया बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा या ट्रोलिंगबद्दल बोलताना दिसल्या. यावेळी नव्या नवेली नंदा ही म्हणाली की, नेगेटिव्ह गोष्टींवर व्यूज आणि कमेंट्स जास्त येतात. यावर जया बच्चन या थेट म्हणाल्या की, तुम्हाला कमेंट करायच्या असतील तर सकारात्मक करा. यावर नव्या म्हणते की, या लोकांना समोर बसवले तर हे काही बोलू शकणार नाहीत.

हे ऐकताच जया बच्चन या म्हणाल्या की, तुमच्यामध्ये काही सांगायची हिंमत असेल तर खऱ्या गोष्टींवर कमेंट करा आणि तुमचा चेहरा देखील दाखवा. यावर श्वेता बच्चन ही म्हणाली की, आजकाल लोकांना दुसऱ्यांच्या दु:खात आनंद होतो. शोमध्ये अजून काही विषयांवर चर्चा करताना जया बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा हे दिसले.

नव्या नवेली नंदा हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना नव्या दिसली. यावेळी नव्या हिला विचारण्यात आले की, तुझ्या शोमध्ये अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सहभागी होणार का? यावर नव्या हिने म्हटले की, तो खूप जास्त मोठा दिवस असेल. लवकरच नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये अभिषेक बच्चन आणि अभिताभ बच्चन हे एकत्र पोहचू शकतात.

भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.