AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना राणावत हिला मोठा झटका, ‘तो’ वाद वाढण्याची शक्यता, दोन राज्यांमध्ये…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. कंगना राणावत सोशल मीडियारही सक्रिय असते. सध्या कंगना ही तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

कंगना राणावत हिला मोठा झटका, 'तो' वाद वाढण्याची शक्यता, दोन राज्यांमध्ये...
Kangana Ranaut
| Updated on: Aug 30, 2024 | 1:05 PM
Share

अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावतची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. बॉलिवूडसोबतच कंगना राणावत हिने आता आपला मोर्चा हा चक्क राजकारणाकडे वळवला आहे. लोकसभेची निवडणूक लढवून कंगना खासदार झालीये. राजकारण सांभाळतच आता कंगना राणावत ही तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. कंगना ही आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बॉस मराठी सीजन 5 च्या मंचावर देखील पोहोचली होती. इमर्जन्सी चित्रपटाचे सध्या प्रमोशन करताना कंगना दिसत आहे. 

इमर्जन्सी चित्रपटाकडून कंगना राणावत हिला मोठ्या अपेक्षा आहेत. कंगना राणावत ही नुकताच बॉलिवूडवर निशाना साधताना दिसलीये. कंगना राणावत हिच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या समस्या आता चांगल्याच वाढताना दिसत आहेत. कंगनाच्या चित्रपटाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. काही आरोप चित्रपटावर करण्यात आले आहेत. 

शीख समुदायाकडून इमर्जन्सी चित्रपटावर आक्षेप घेण्यात आलाय. भावना दुखावल्याचा आरोप आहे. शीख समुदायाने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पंबाजमध्ये चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असतानाच आता तेलंगणातही चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जातंय. यामुळे आता हा वाद वाढण्याची दाट शक्यता देखील आहे. 

रिपोर्टनुसार, भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी तेजदीप कौर मेनन यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा शीख सोसायटीच्या शिष्टमंडळाने सरकारी सल्लागार मोहम्मद अली शब्बीर यांची भेट घेतली. यावेळी शीख संघटनेने इमर्जन्सीच्या स्क्रीनिंगवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता तेलंगणात चित्रपट रिलीज होणार की, नाही हे पाहण्यासारखे ठरणार आहे. 

एकीकडे चित्रपटाला विरोध वाढत असतानाच कंगना जोरदार प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीमध्ये कंगना राणावत हिने म्हटले होते की, मी खान, कपूर आणि कुमारचे चित्रपट करत नाही. माझ्या इमर्जन्सी चित्रपटाला जर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर हे लोक तोंड दाखवण्यासही राहणार नाहीत. कंगना राणावत हिने काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनाबद्दल एक धक्कादायक विधान केले होते.  

Follow Us
मोठी बातमी! विश्वासू नेत्यासह सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश;
मोठी बातमी! ठाकरेंच्या विश्वासू नेत्यासह सर्व समर्थकांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश; कणकवलीत नितेश राणेंचा धक्का
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक रद्द
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचं जात प्रमाणपत्र अचानक  रद्द, पदावर टांगती तलवार
धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
Omraje Nimbalkar : धारशिवमधील आश्रम शाळेची दुरावस्था समोर, ओमराजेंनी दिली भेट
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल