
Actress Life : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात कठीण वेळ म्हणजे जेव्हा तिच्यावर अबॉर्शन करण्याची वेळ आली. वयाच्या 30 व्या अभिनेत्रीने अबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला. सर्वात धक्कादायक म्हणजे जेव्हा बॉयफ्रेंडने जबाबदारी घेण्यास नकार दिला तेव्हा अभिनेत्रीने अबॉर्शचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री कुब्रा सैत आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘त्या घटनेला आज अनेक वर्ष झाली आहेत आणि याबद्दल विचार करण्यासाठी आणि त्यातून बाहेर येण्यासाठी मला फार वेळ लागला, पण आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा तुम्ही स्वतःला संकटात पाहता… कारण तुमचा विश्वास, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या सभोवतालचं जग सगळ्या गोष्टींचे विचार मनात सुरु होतात. तुम्हाला तुमची कर्तव्ये माहित असतात, तुम्हाला माहिती आहे की समाज तुमच्याकडे कसा पाहतो आणि तुम्हाला योग्य आणि अयोग्य यांच्यात अडकल्य सारखं वाटतं.’
कुब्रा म्हणाली, ‘कठीण प्रसंगी खरंच कळत नाही, तुम्ही जो निर्णय घेत आहात तो योग्य आणि अयोग्य. पण आज मी पूर्ण विश्वासाने सांगेल की, मी जो निर्णय घेतला. तो बरोबर होता. कारण मला माहित आहे की जरी मी चूक केली असती तरी देव पाहत असतो आणि त्याचे परिणाम मला परलोकात भोगावे लागले असते.’
कुब्राने पूर्वी खुलासा यापूर्वी देखील स्वतःच्या अबॉर्शन बद्दल मोठा खुलासा केला होता, हा अनुभव समजण्यासाठी तिला अनेक वर्षे लागली. काही वर्षांनंतर एका प्रोजेक्टचं चित्रीकरण करताना तिला अनेकदा अस्वस्थ वाटायचं. त्या काळात अभिनेत्रीला तिव्र रक्तस्त्राव आणि चिडचिड व्हायची, पण तिने तिची स्थिती तिच्या आजूबाजूच्या लोकांसोबत शेअर न करण्याचा निर्णय घेतला.
2022 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमॉयर‘ पुस्तकात अभिनेत्रीने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.