पंकज धीर यांनी बनवलेला भारतातील पहिला ‘अश्लील सिनेमा’, हॉटेलच्या बंद खोलीत झालेलं सिनेमाचं चित्रिकरण
Pankaj Dheer Death : पंकज धीर यांनी कॅनडातील कॅमेरा क्रूसह बनवलेला भारतातील पहिला 'अश्लील सिनेमा', हॉटेलच्या बंद खोलीत झालेलं सिनेमाचं चित्रिकरण, काय होतं सिनेमाचं नाव

दिवाळीला आता काही दिवसांवर आली आहे. दरम्यान, बॉलिवूडसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. महाभारत’ मालिकेत कर्णची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. 14 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री त्यांचं निधन झालं आहे. पंकज धीर यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. पंकज धीर यांनी फक्त हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं नाही तर, मराठी सिनेविश्वात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण पंकज धीर यांच्याबद्दल एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.
पंकज धीर यांनी भारतातील पहिला अश्लील सिनेमा बनवला. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचं नाव “बॉम्बे फॅन्टसी” असं होतं. पंकज धीर यांनी सिनेमा दिग्दर्शित केला होता. सांगायचं झालं तर, ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका साकारल्यामुळे अनेक जण त्यांची पूजा देखील करु लागलेले. कर्नाल आणि बस्तरच्या कर्ण मंदिरांमध्ये त्यांच्या पूर्ण आकाराच्या मूर्ती स्थापित केल्या आणि त्यांची दररोज पूजा केली जायची.
पण 1983 मध्ये जेव्हा त्यांनी पहिला भारतीय अश्लील सिनेमा “बॉम्बे फॅन्टसी” प्रदर्शित केला तेव्हा बरीच खळबळ उडाली. ‘बॉम्बे फॅन्टसी’चं दिग्दर्शन पंकज धीर यांनी केलं होतं, तर प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक मजहर खान यांनी सिनेमाची निर्मिती केली होती. यामध्ये अभिनेता केएन सिंह यांचा मुलगा विभूषण सिंह पॉल मुख्य भूमिकेत होता.
“बॉम्बे फॅन्टसी” हा सेन्सॉर बोर्डाकडून ‘एडल्ट सर्टिफिकेट’ मिळवणारा पहिला भारतीय सिनेमा ठरला. भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच दोन जोडप्यांना – किंवा चार लोकांना – एकत्र बेडवर दाखवल्यामुळे त्याला अश्लील सिनेमान म्हणून घोषित करण्यात आलं.
देशातील पहिल्या अश्लील सिनेमाच्या चित्रिकरणासाठी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथून कॅमेरा क्रू बोलावण्याच आला. बेडरूममधील सीन मुंबईतील प्रसिद्ध सन अँड सँड हॉटेलमध्ये चित्रित करण्यात आले. यासाठी कॅनडाहून आलेले कॅमेरा क्रू आणि कलाकार अनेक दिवस या हॉटेलमध्ये राहिले होते.
