AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकज धीर यांचं ‘कॅन्सर रीकरेन्स’मुळे निधन, उपचारानंतरही आजार कधी ठरतो घातक?

Pankaj Dheer Death : 'कॅन्सर रीकरेन्स' नक्की असतं तरी काय, ज्यामुळे पंकज धीर यांनी गमावले स्वतःचे प्राण, उपचारानंतरही 'हा' गंभीर आजार कधी ठरतो घातक?

पंकज धीर यांचं 'कॅन्सर रीकरेन्स'मुळे निधन, उपचारानंतरही आजार कधी ठरतो घातक?
| Updated on: Oct 15, 2025 | 3:31 PM
Share

धक्कादायक सत्य म्हणजे अनेक सेलिब्रिटींचं निधन कॅन्सरमुळे झालं आहे. आता पुन्हा कॅन्सरमुळे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं. ते बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंजत होते पण कॅन्सरशी त्यांची झुंज अपयशी ठरली. अखेर वयाच्या 68 व्या वर्षी पंकज यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर पंकज धीर यांना पुन्हा कॅन्सर झाल्याचं समोर आले. अनेकदा कॅन्सरच्या रुग्णांमध्ये असं घडतं. उपचार किंवा शस्त्रक्रियेनंतर, कॅन्सरची लक्षणं काही काळासाठी बरी होतात, परंतु नंतर “कॅन्सर रीकरेन्स” च्या स्वरूपात परत येतात.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कधीकधी, शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा केमोथेरपीनंतरही, काही कॅन्सरच्या पेशी शरीरात लपून राहतात. कालांतराने, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे, या पेशी पुन्हा सक्रिय होतात आणि कॅन्सर परत येण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, निरोगी आणि आरोग्यास लाभदायक पदार्थ खाल्ले पाहिजे. डॉक्टरांनी जंक फूड आणि पॅकेज्ड फूड टाळण्याचा सल्ला दिला…

शरीरात उरलेल्या कॅन्सरच्या पेशींमुळे कर्करोग पुन्हा होऊ शकतो… असं देखील डॉक्टर म्हणतात,

शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी: शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपीनंतरही जर काही पेशी शरीरात राहतात. कालांतराने त्या पेशी पुन्हा सक्रिय होतात. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती: बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरु असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींची पुन्हा वाढ होऊ शकते.

कॅन्सरचे प्रकार आणि टप्पा: काही प्रकारचे कॅन्सर (जसं की मूत्राशय, स्तन किंवा कोलन कर्करोग) पुन्हा होण्याची शक्यता जास्त असते, विशेषतः जर ते स्टेज 3 किंवा 4 असेल तर…. एवढंच नाही तर, धूम्रपान, अस्वस्थ खाण्याच्या सवयी किंवा अनुवांशिक पूर्वस्थिती यामुळे देखील कर्करोग परत येण्याचा धोका अधिक असतो.

कॅन्सर पुन्हा कधी होऊ शकतो?

एकदा कॅन्सरवर उपचार झाल्यानंतर कॅन्सर पुन्हा काही महिन्यांनंतर परत डोकंवर काढू शकतो. डॉक्टरांनी याचे तीन भागांमध्ये विभाजन केलं आहे. लोकल रीकरेन्स म्हणजे, त्याच जागी पुन्हा कॅन्सर होणे, रीजनल रीकरेन्स म्हणजे जवळच्या लिम्फ नोड्समध्ये पसरणे आणि डिस्टेंट रीकरेन्स शरीराच्या इतर भागांमध्ये पसरणे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.