
बॉलिवूडमध्ये बोल्ड सीन किंवा बोल्ड कपडे आता आगदीच सामान्य झालं आहे. सध्या काही कलाकार तर न्यूड फोटोशूटही करतात. जो की एक फॅशनचा भाग असतो किंवा एखाद्या कॅलंडरसाठी. पण त्या फोटोंना सर्वजण स्वीकारतात असं नाही बऱ्याचवेळा कलाकारांना ट्रोलिंग सहन करावं लागतं. पण अशी एक बॉलिवूड अभिनेत्री जिचे अशा न्यूड फोटोशुटमुळे करिअर उद्ध्वस्त झालं आहे. करिअर संपलं. एवढंच काय तर तिच्यावर यासाठी केसही करण्यात आली होती. कोण होती ही बॉलिवूड अभिनेत्री माहितीये?
या जाहिरातीचा वैयक्तिक आयुष्यावरही खूप परिणाम झाला
ही अभिनेत्री म्हणजे मधु सप्रे. 1990 च्या दशकातील एक प्रसिद्ध मॉडेल. तिच्या सौंदर्यामुळे, वेगळ्या शैलीमुळे आणि आत्मविश्वासामुळे तिने मॉडेलिंगच्या जगात एक खास ओळख निर्माण केली होती. 1992 मध्ये ती मिस इंडिया बनली आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले, जिथे तिने सेकंड रनर-अपचा किताब जिंकला. जेव्हा तिची तिचं करिअर प्रगतीच्या मार्गावर होतं. तिला अनेक जाहिरातींसाठी ऑफर येऊ लागल्या होत्या. मात्र त्यावेळी तिने केलेल्या एका जाहिरातीमुळे तिचे नाव एका वादात अडकले. या वादाचा तिच्या करिअरवर परिणाम झाला. एवढंच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही खूप परिणाम झाला.
बोल्ड फोटोशूट महागात पडले
मधु सप्रे नाव तेव्हा चर्चेत आले जेव्हा तिने प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमणसोबत शूज कंपनी फिनिक्ससाठी एक बोल्ड फोटोशूट केलं होतं. या जाहिरातीत दोघांच्याही शरीराभोवती एक अजगर साप गुंडाळला होता आणि त्यांनी फक्त त्या कंपनीचे शूज घातले होते. या जाहिरातीमुळे त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता, कारण त्यावेळी भारतात समाज आणि माध्यमांमध्ये अशा बोल्ड फोटोशूटला स्वीकारणे कठीण होते. अनेकांनी याला अश्लील फोटोशूट म्हटले होते.
पोलिसांनी अश्लीलता पसरवल्याबद्द खटला दाखल केला
हा वाद इतका वाढला की मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर अश्लीलता पसरवल्याबद्दल खटला दाखल केला. हा खटला जवळजवळ चौदा वर्षे न्यायालयात चालला. या काळात मधू आणि मिलिंद दोघांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, परंतु अखेर न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. मधु सप्रेने या प्रकरणावर एका मुलाखतीत सांगितले होते की, हे फोटोशूट तिच्या करिअरचा एक भाग आहे आणि त्यात काहीही चुकीचे किंवा अश्लील नव्हते.
बॉलिवूडमध्ये एन्ट्री
मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर मधु सप्रेने बॉलिवूडमध्येही प्रवेश केला.2003 मध्ये ‘बूम’ चित्रपटात तिने अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफसोबत काम केले होते, पण हा तिचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.
आता अभिनेत्री काय करते?
मधुने 2001 मध्ये इटालियन उद्योगपती जियान मारियाशी लग्न केले. आता ती तिच्या कुटुंबासह इटलीमध्ये राहते आणि तिची मुलगी इंदिरासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. या ग्लॅमरच्या जगाशी तिचा काहीही संबंध नाही.