मुमताज पेक्षाही सुंदर आहेत त्यांच्या मुली, फोटो पाहून चाहत्यांच्या खिळल्या नजरा
Mumtaaz Daughter: कधीकाळी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या मुमताज यांच्या मुलींचं सौंदर्य पाहून म्हणाल... फोटो तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुमताज यांच्या मुलींच्या व्हायरल फोटोंची चर्चा...
हिंदी सिनेविश्वात एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री मुमताज यांनी मोठ्या पडद्यावर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मुमताज यांनी त्यांच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ केलं. आज मुमताज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी कायम कोणत्या न कोणत्या करणामुळे चर्चेत असतात. पण आता मुमताज त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, मुलींमुळे चर्चेत आल्या आहेत. मुमताज यांच्या मुलींचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मुमताज यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी फिल्म मेकर मयूर माधवानी यांच्यासोबत लग्न केलं. मुमताज यांच्या मोठ्या मुलीचं नाव नताशा माधवानी तर, दुसऱ्या मुलीचं नाव तान्यू माधवानी असं आहे. नताशा माधवानी हिचा जन्म इंग्लंडमध्ये झाला.
View this post on Instagram
आई-वडिलांप्रमाणे नताशा माधवानीलाही फिल्मी दुनियेत विशेष रस नव्हता. नताशा कायमच चित्रपटाच्या प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असे. नताशा ही तिच्या आईपेक्षा देखील फार सुंदर आहे. सुंदर असून देखील नताशा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. नताशा हिला लाईमलाईटमध्ये राहायला बिलकूल आवडत नाही .
नताशा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला नाही. पण नताशा हिने जोडीदार म्हणून अभिनेत्याची निवड केली. नताशा हिचं लग्न फरिदन खान याच्यासोबत झालं आहे. फरिदन खान हा अभिनेते आणि निर्माते फिरोज खान यांचे पूत्र आहेत.
View this post on Instagram
नताशा आणि फरिदन यांचं लग्न 14 डिसेंबर 2005 मध्ये झालं होते. दोघांना एक मलगी दियानी इसाबेला आणि मुलगा आहे. त्यांच्या मुलाचं नाव एजारियस फरदीन खान असं आहे. सध्या सोशल मीडियावर मुमताज यांच्या मुलींचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.
मुमताज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्यांसोबत मुमताज यांनी स्क्रिन शेअर केली. धर्मेंद्र, शम्मी कपूर, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या अभिनेत्यांसोबत मुमताज झळकल्या. आता सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.