
Bollywood Actress : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रीने अनेक खुलासे केले आहेत. चित्रपटसृष्टीत कास्टिंग काउचचा प्रश्न अनेक वर्षांपासून अधूनमधून समोर येत आहे. अनेक अभिनेत्रींनी वेळोवेळी आपले अनुभव मांडले आहेत. काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्री मोठा खुलासा केला होता. ‘तडजोड न केल्यास काम मिळत नाही’ असेही काहींनी स्पष्टपणे सांगितले आहे. मीटू मोहिमेदरम्यान एका चर्चित अभिनेत्रीने केलेल्या खुलाशांमुळे मोठी खळबळ उडाली होती.
अभिनेत्री पायल रोहतगीने मीटू अभियानाच्या काळात आपल्यासोबत घडलेल्या कथित प्रकाराबाबत सार्वजनिकरित्या वक्तव्य केले होते. तिने एका चित्रपटासाठी भूमिका देण्याच्या बदल्यात अयोग्य मागणी करण्यात आल्याचा आरोप केला होता. पायल रोहतगीने दिग्दर्शक दिबाकर बनर्जी यांच्यावर कास्टिंग काउचचे आरोप केले होते. तिच्या म्हणण्यानुसार, एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी ती दिग्दर्शकांना भेटल्या असता त्यांच्याकडून अयोग्य वर्तन करण्यात आले. 2011 साली प्रदर्शित झालेल्या शंघाई या चित्रपटाच्या संदर्भात हा प्रसंग घडल्याचा दावा तिने केला होता.
पायल रोहतगीच्या आरोपानुसार, ऑडिशनदरम्यान दिग्दर्शकांनी तिला स्कर्ट वर करून पोट दाखवण्यास सांगितले. तसेच पहिले मला खुश करावे लागेल, तेव्हाच काम मिळेल असेही कथितरित्या सांगितल्याचा तिने दावा केला होता. या मागणीला तिने नकार दिल्यानंतर तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि पुढे काम मिळणेही कठीण झाले असे तिने म्हटले आहे. मात्र, दिबाकर बनर्जी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यांनी अशा प्रकारचे कोणतेही वर्तन न केल्याचे सांगितले.
अभिनेता संग्राम सिंह यांच्याशी विवाह
पायल रोहतगीच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, तिने 2002 साली प्रदर्शित झालेल्या ये क्यो हो रहा है? या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली. तसेच ती बिग बॉस 2 सारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.
वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचे झाल्यास, पायल रोहतगीने 2022 साली कुस्तीपटू आणि अभिनेता संग्राम सिंह यांच्याशी विवाह केला. तिच्या या खुलाशांनंतर चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काउचच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली होती.