AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महत्त्वाची बातमी! या लोकांना 1 मार्चपासून व्हॉट्सॲप वापरता येणार नाही, काय आहे सिम बाइंडिंगचा नियम?

WhatsApp SIM Binding : सिम-बाइंडिंग नियमाबाबत केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे. आता मेसेजिंग अॅप्सना त्यांचे अकाउंट सिम कार्डशी लिंक करणे बंधनकारक असणार आहे.

महत्त्वाची बातमी! या लोकांना 1 मार्चपासून व्हॉट्सॲप वापरता येणार नाही, काय आहे सिम बाइंडिंगचा नियम?
Whats AppImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 27, 2026 | 6:30 PM
Share

देशभरातील करोडो नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सिम-बाइंडिंग नियमाबाबत केंद्र सरकारने कडक भूमिका घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने असे स्पष्ट केले आहे की, आता मेसेजिंग ॲप्सना त्यांचे अकाउंट सिम कार्डशी लिंक करणे बंधनकारक असणार आहे. याबाबत कोणतीही सूट देण्याचा सरकारचा विचार नाही. त्यामुळे आता 1 मार्चपासून सरकार या नियमाची कडक अंमल बजावणी करणार आहे. दूरसंचार विभागाने (DoT) OTT मेसेजिंग ॲप्सना याबाबत स्पष्टपणे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अनेक यूजर्सना व्हॉट्सॲप वापरता येणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

व्हॉट्सॲपवर काय परिणाम होणार?

सिम-बाइंडिंग नियम लागू झाल्यानंतर व्हॉट्सॲप वापरताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या नियमांनुसार जर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम नोंदणी करण्यासाठी वापरलेले सिम कार्ड फोनमध्ये नसेल, तर ॲपचा वापर मर्यादित होऊ शकतो किंवा बंदही होऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे भारतात सर्वाधिक व्हॉट्सॲप वापरकर्ते आहेत. यातील अनेक लोक वेगवेगळ्या डिव्हाइसवर एकच नंबर वापरतात. त्यामुळे 1 तारखेपासून अनेक डिव्हाइसवर एकच खाते सक्रिय केलेल्या लाखो वापरकर्त्यांचे व्हॉट्सॲप काम करणार नाही.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हवाल्याने अनेक बातम्या समोर आल्या आहेत. सिंधिया यांनी म्हटले की, सुरक्षा प्रथम येते आणि सिम-बाइंडिंग नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही. सरकारला वाटत आहे की डिजिटल फसवणूक आणि बनावट नंबर वापरून होणारे गुन्हे रोखण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सिम बाइंडिंगचा परिणाम कोणावर होणार?

  • एकाच सिम कार्ड वापरून अनेक डिव्हाइसवर व्हॉट्सॲप वापरतात किंवा जे वारंवार सिम कार्ड बदलतात त्यांना याचा फायदा होऊ शकतो.
  • हा नियम लागू झाल्यानंतर व्हॉट्सॲप वेब दर सहा तासांनी आपोआप लॉग आउट होईल. यानंतर पुन्हा लॉगिन करावे लागेल.

सिम बाइंडिंगनंतर व्हॉट्सॲपचे लिंक्ड डिव्हाइसेस काम करणार का?

व्हॉट्सॲपच्या लिंक्ड डिव्हाइसेस या फीचरमुळे व्हॉट्सॲप एकाच नंबर वापरून अनेक डिव्हाइसेसवर उघडता येते. मात्र या नियमामुळे यावर निर्बंध लादले जाणार आहेत. सिम बाइंडिंग नियमानंतर, लिंक्ड डिव्हाइस पूर्णपणे काम करणे थांबवणार नाही, मात्र यावर मर्यादा येणार आहेत. कारण व्हॉट्सॲप फक्त त्या फोनवर काम करेल ज्यामध्ये व्हॉट्सॲप खाते तयार करण्यासाठी वापरलेले सिम कार्ड आहे. जर डिव्हाइसमधून सिम कार्ड काढून टाकले तर व्हॉट्सॲप बंद पडण्याची शक्यता आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे