
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायमच चर्चेत असते. सोनाक्षीने अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. मात्र, तिने काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आणि तिच्यावर टीकेची एकच झोड उडाली. शेवटी अभिनेत्रीने कंटाळून कमेंट बॉक्सच बंद केला. सोनाक्षीने काही वर्ष डेट केल्यानंतर जहीरसोबत लग्न केले. सुरूवातीचे काही वर्ष तिने हे नाते सर्वांपासून लपून ठेवले. बऱ्याचदा अभिनेत्री टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसते. जहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा हिने आपल्या कामावरही लक्ष केंद्रित केले. सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बाल याच्यासोबत सिव्हिल मॅरेज केले. लग्नावेळी अत्यंत जवळचे लोक उपस्थित होते. जहीरसोबत चांगला वेळ घालवताना सोनाक्षी सिन्हा कायमच दिसते.
जहीर इक्बाल याच्यासोबत खास फोटो शेअर करताना सोनाक्षी कायमच दिसते. जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. त्या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा घराबाहेर उभी आहे. मात्र, जहीर इक्बाल दार उघडत नाही. अभिनेत्री कितीतरी वेळ घराबाहेर वैतागून उभी आहे. सोनाक्षी सिन्हा हिची होणारी हालत जहीर इक्बाल कॅमेऱ्यातून बघत आहे. मात्र, तो दरवाजा उघडत नाही.
सोनाक्षी सिन्हा हिचा गोंधळ ऐकून शेजारी देखील घराबाहेर आले. मात्र, तरीही जहीर इक्बाल काही दरवाजा उघडण्याचे नाव घेत नाही. याचाच व्हिडीओ व्हायरल होतोय. सोनाक्षी हसताना देखील दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने कमेंट करत म्हटले की, ही तर सुरूवातच आहे… पुढे बघ काय काय होते. सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत मस्ती करताना जहीर इक्बाल दिसत आहे.
सोनाक्षी सिन्हाची झालेली स्थिती पाहून त्याला हसू येत आहे. दुसऱ्याने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, इतकी मजाक करण्याची हिंमत जहीरमध्ये कशी आहे? जगातील पहिला हा पती असावा की, त्याची इतकी जास्त हिंमत आहे. जहीर इक्बाल कायमच सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत अशाप्रकारची मस्ती करतान दिसतो. सोनाक्षी आणि जहीर याच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.