सनी लियोनी झाली ऊप्स मोमेंटची शिकार, शेजारी असणाऱ्या नवऱ्याने…, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी आणि तिचा नवऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सनी लियोनी ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे.

सनी लियोनी झाली ऊप्स मोमेंटची शिकार, शेजारी असणाऱ्या नवऱ्याने..., व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 04, 2026 | 4:13 PM

Sunny Leone : बॉलिवूडपासून साऊथ सिनेसृष्टीपर्यंत आपल्या ग्लॅमर आणि अभिनयाने ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनी सध्या चर्चेत आहे. सनी सध्या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘स्प्लिट्सविला 16’चे सूत्रसंचालन करत असून हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. शोमधील अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतानाच आता सनी लिओनीचा आणखी एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

सनी लिओनी नुकतीच पती डॅनियल वेबरसोबत मुंबईतील एका भव्य इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी सनीने ब्राऊन रंगाचा डीप नेक ड्रेस परिधान केला होता. या लूकमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसत होती. रेड कार्पेटवर सनी आणि डॅनियलने पॅपराझींसमोर मनसोक्त पोज दिल्या आणि फोटो व व्हिडीओंसाठी वेळ दिला.

पॅप्ससमोर घडला अनपेक्षित क्षण

इव्हेंटदरम्यान पॅप्सना पोज देत असतानाच सनी लिओनी ऊप्स मोमेंटची शिकार झाली. हा प्रसंग अचानक घडल्याने सनी काही क्षण गोंधळलेली दिसली. मात्र याच वेळी तिचा पती डॅनियल वेबरने प्रसंगावधान राखत सनीला इशाऱ्याने सतर्क केले. डॅनियलच्या या समजूतदारपणामुळे सनीने त्वरित आपला ड्रेस सावरला आणि मोठा प्रसंग टळला.

हा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असून अनेक जण डॅनियल वेबरच्या काळजीवाहू स्वभावाचं कौतुक करत आहेत.

सनी लिओनीचा चित्रपट प्रवास

सनी लिओनीने 2009 मध्ये ‘जिस्म 2’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘जॅकपॉट’, ‘रागिनी एमएमएस 2’, ‘हेट स्टोरी 2’, ‘एक पहेली लीला’, ‘मस्तीजादे’, ‘वन नाईट स्टँड’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. चित्रपटांसोबतच सनी म्युझिक व्हिडीओज आणि रिअ‍ॅलिटी शोमध्येही सातत्याने झळकत असते. सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्सचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

सनी लिओनीने 2011 साली डॅनियल वेबरसोबत विवाह केला. हे जोडपं त्यांच्या कुटुंबासाठी ओळखलं जातं. सनी आणि डॅनियलला तीन मुले आहेत. यामध्ये दोन जुळे मुलं सरोगसीद्वारे जन्मलेले असून, एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे.