AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 वेळा नग्न करून चेकिंग… टॉर्च मारून… दाहक अनुभव सांगताना अभिनेत्री रडली ढसाढसा

अभिनेत्री संदीपा विर्कने तिहार जेलमधील 4 महिन्यांचा दाहक अनुभव कथन केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असताना तिला वारंवार, जवळपास 25-30 वेळा नग्न करून तपासले गेले. या अपमानजनक आणि अमानवीय वागणुकीमुळे तिला तीव्र मानसिक आघात झाला आहे.

30 वेळा नग्न करून चेकिंग... टॉर्च मारून... दाहक अनुभव सांगताना अभिनेत्री रडली ढसाढसा
Sandeepa VirkImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2026 | 7:21 PM
Share

अभिनेत्री आणि डीजिटल कंटेट क्रिएटर संदीपा विर्क (Sandeepa Virk) ही सध्या तिच्या करिअरपेक्षा वैयक्तिक कारणामुळे अधिक चर्चेत आहे. तिचा संघर्षच खूप मोठा आहे. तब्बल 6 कोटी रुपयांशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये (Money Laundering Case) नाव आल्यानंतर तिला दिल्लीच्या तिहार तुरुंगात चार महिने काढावे लागले. आता जामीन मिळाल्यानंतर ती बाहेर आली आहे. बाहेर आल्यानंतर तुरुंगातील आलेला दाहक अनुभव तिने सांगितला आहे. तिने अत्यंत धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी वाचताना कुणाच्याही मनात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही.

संदीपा विर्कने अत्यंत कडवट अनुभव शेअर केले आहेत. एका पॉडकास्टमध्ये तिने या गोष्टी मांडल्या आहेत. मला तुरुंगात वारंवार नग्न करण्यात आलं. कोर्टात हजेरी लावल्यानंतर बसमध्ये बसण्यापूर्वी सर्वांसमोर एकवेळ नग्न केलं जातं. जरा विचार करा. मला तीन तीन वेळा नग्न केलं जायचं. लोकांना वाटतं फक्त तुरुंगातच तर गेली. पण तसं नाहीये. त्यानंतर काय काय होतं, हे मला माहीत आहे, असं सांगतानाच गेल्या चार महिन्यात चेकिंगच्या नावाखाली मला 25-30 वेळा नग्न केलं गेलंय, असं सांगताना संदीपा ढसाढसा रडली.

ब्रेस्ट उचलून चेकिंग…

तुरुंगात जाण्याची प्रक्रिया इतकी भीतीदायक आणि अपमानजक आहे की व्यक्ती स्वत:च्या नजरेतून पडतो. आपल्या समाजात आणि सिस्टिममधील सर्वात मोठा दोष म्हणजे तुम्ही दोषी ठरण्याआधीच तुम्हाला आरोपी मानलं जातं. तुरुंगात एन्ट्रीच्यावेळी जी चेकिंग होते, त्यामुळे एखाद्या महिलेचा आत्मसन्मानच गळून पडतो. ब्रेस्टला उचलून सर्व बाजूने चेकिंग केली जाते, असं तिने सांगितलं.

काही लपवून तर ठेवलं नाही ना…

तुरुंगात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला सुरक्षा रक्षक अत्यंत वाईट असतात. तुरुंगात महिलांची होणारी चेकिंग अत्यंत लज्जास्पद असते. ज्या महिलांचे ब्रेस्ट साईज मोठे असतात, त्यांचे ब्रेस्ट उचलून चेक केले जातात. त्याखाली काही लपवलं तर नाही ना हे चेक करण्यासाठी. हा सर्व प्रकार किळसवाणा आणि असंवेदनशील आहे, असं ती म्हणाली.

टॉर्च मारून चेकिंग…

सर्वात धक्कादायक म्हणजे एका सुरक्षा रक्षक महिलेने चेक केल्यानंतर काम संपलं असं नाही. ज्यांची वेगवेगळी ड्युटी असते, अशा सर्व सुरक्षा रक्षक महिलांच्यासमोर नग्न व्हावे लागते. तुम्ही दोनदा नग्न होता. त्यानंतर कोर्टातून तुरुंगात आल्यावर पुन्हा तुम्हाला कपडे काढून चेक केलं जातं. तुम्ही दिवसातून तीन तीन वेळा नग्न होता. माझं सोडा. ज्या गुन्हेगार महिला आहेत, त्यांना तर खाली टॉर्च मारूनही चेक केलं जातं, असंही तिने सांगितलं.

आजही औषधं सुरू…

हा सर्व प्रकार पाहून मी जोरजोरात रडले. मला तर जीवच द्यावासा वाटलं होतं. या काळात मी मेंटल ट्रॉमा सहन केला. तुरुंगात काढलेल्या वाईट दिवसामुळे मनावर त्याचा खोल परिणाम होतो. मी ते दिवस कधीच विसरणार नाही. यातून बाहेर पडण्यासाठी मी आजही औषधे घेत आहे, असंही तिने सांगितलं.

संदीपा कोण आहे?

संदीपाने मॉडेलिंगमध्ये तिचं करिअर सुरू केलं होतं. त्यानंतर तिने पंजाबी सिनेमात काम करणं सुरू केलं. शूटिंग करत असतानाच तिने अनेक सिनेमे सोडले होते. कारण तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?