AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वीच चीनचा अमेरिकेला मोठा झटका; गप बसायचं नाही तर… थेट उघड उघड धमकी, तरीही ट्रम्प जिनपिंग यांना भेटणार

मोठी बातमी समोर येत आहे, डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वीच चीनने अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. चीनकडून अमेरिकेला उघड -उघड धमकी देण्यात आली आहे.

ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वीच चीनचा अमेरिकेला मोठा झटका; गप बसायचं नाही तर... थेट उघड उघड धमकी, तरीही ट्रम्प जिनपिंग यांना भेटणार
Donald TrumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 13, 2026 | 6:51 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी चीनला रवाना झाले आहेत. ही भेट जरी दोन नेत्यांमध्ये होणार असली तर या भेटीला मोठं महत्त्व आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. सध्या अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जग मोठ्या ऊर्जा संकटात सापडलं आहे. इराण चीनचा मित्र आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेसोबतच्या युद्धात चीनने इराणची मदत केली असे आरोप देखील झाले होते. तसेच अमेरिकेनं सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे चीन आणि अमेरिकेमधील संबंध बिघडल्याचं देखील समोर आलं. या सर्व पार्श्वभूमीवर आता चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीपूर्वीच चीनने अमेरिकेला मोठा झटका दिला आहे. चीनकडून अमेरिकेला थेट उघड उघड धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेतील चीनच्या दूतावासाने या संदर्भात ट्विट केलं आहे. चार असे मुद्दे आहेत, ज्यावर अमेरिकेनं शांत बसावं तरच डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची बैठक चांगली होऊ शकते, अन्यथा जर ट्रम्प यांनी ही लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका आणि चीनचे संबंध खराब होतील असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. तैवानचा प्रश्न, लोकशाही आणि मानवाधिकाराची गोष्ट, चीनचा आपल्या विकासाचा अधिकार आणि राजनौतिक व्यवस्था या चार प्रश्नांमध्ये अमेरिकेनं दखल देण्याचा प्रयत्न करू नये, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हा ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी चीनचा अमेरिकेला उघड उघड इशाराच मानला जात आहे. दरम्यान यावर आता अमेरिका काय भूमिका घेणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.

चीन अमेरिकेमध्ये तणाव

दरम्यान चीन आणि अमेरिकेमध्ये आधीच मोठा तणाव आहे. अमेरिकनं टॅरिफ वॉरमुळे चीन आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपूर्ण जगानं पाहिला आहे. तसेच त्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू झालं. युद्धाकाळात चीनने इराणला मदत केल्याचा आरोप देखील होत आहे. ही गोष्ट अमेरिकेला फारशी रुचणारी नाहीये, तसेच अमेरिका कायमच चीनला आपला प्रतिस्पर्धी मानत आला आहे, त्यामुळे अशा वातावरणात आता ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची बैठक होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक