
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या तूफान चर्चेत आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याचे अनेक दिवसांपासून सांगितले जाते. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूरला डेट करतंय. हेच नाही तर काही दिवसांपूर्वी दोघेही एकमेकांच्यासोबतचे खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसले. विदेशातही खास वेळ घालवताना दिसले होते, ज्याचे फोटो अर्जुन कपूर याने शेअर केले होते. सततच्या ब्रेकअपच्या चर्चांवर यांनी भाष्य केले नाहीये.
मलायका अरोरा ही पॅरिसमध्ये खास वेळ घालवताना दिसली. पॅरिसमधील खास फोटो हे मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर शेअर केले. अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सतत विदेशात फिरताना मलायका अरोरा ही दिसत आहे. आता नुकताच मलायका अरोरा हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये ती मोठे खुलासे करताना दिसत आहे.
मलायका अरोरा ही म्हणाली की, माझ्याबद्दल ज्यावेळी वाईट लिहिले जाते आणि मी ते वाचते तर माझा दिवस खराब जातो. एक सरळ गोष्ट आहे की, मी काही गोष्टी ब्लॉक करून टाकते आणि पुढे जाते. मी स्वत:ला जशी आहे, तशी ठेवण्यासाठी खूप जास्त मेहनत घेते. स्वत:ला चांगले ठेवण्यासाठी मी योगा करते. शांत ठेवण्यासाठी मी मेडिटेशन देखील करते.
चांगले खाते आणि वेळेवर झोपते. मलायका अरोरा पुढे म्हणते की, लोक माझ्या फिटनेसचे काैतुक करतात. बरेच लोक म्हणतात की, 48 वर्षांची असूनही तू जबरदस्त दिसते. 48 वयामध्येही मी असे दिसण्यासाठी खूप मेहनत घेते आणि फोकस ठेवते, असेही मलायका अरोरा म्हणाली आहे. थोडक्यात काय तर होणाऱ्या टिकेचा परिणाम हा मलायका अरोरा हिच्यावर होतो.
मलायका अरोरा हिने 2017 मध्ये अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. मात्र, मुलगा अरहान याच्यामुळे अनेकदा मलायका अरोरा आणि अरबाज खान हे एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वीच अरबाज खान याने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. बहीण अर्पिता खान हिच्या घरी हा लग्नसोहळा पार पडला. खास लोकांच्या उपस्थितीमध्ये अरबाज खान याने लग्न केले.