Jawan फेम नयनतारा हिने मोडलाय विवाहित सेलिब्रिटीचा संसार; 2 वर्षांच्या नात्यानंतर मात्र…

Nayanthara | तीन मुलांचा बाप असूनही नयनतारा हिच्यावर जीवापाड प्रेम करायचा 'हा' सेलिब्रिटी..., दोन वर्ष अभिनेत्रीला डेट केल्यानंतर त्याने घेतला मोठा निर्णय

Jawan फेम नयनतारा हिने मोडलाय विवाहित सेलिब्रिटीचा संसार; 2 वर्षांच्या नात्यानंतर मात्र...
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 1:23 PM

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री नयनतारा (nayanthara) आगामी ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात नयनतारा अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमात नयनतारा आणि शाहरुख सिनेमात रोमान्स करताना दिसणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. आता नयनतारा ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा, नयनतारा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. एका प्रसिद्ध सेलिब्रिटीसोबत नयनतारा हिचे प्रेमसंबंध होते. पण तीन मुलांच्या वडिलांच्या प्रेमात असल्यामुळे अभिनेत्रीवर संसार तोडल्याचे देखील आरोप करण्यात आले.

ज्या सेलिब्रिटीसोबत अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये तो सेलिब्रिटी दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रभू देवा आहे. नयनतारा दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. नयनतारा हिला पाहण्यासाठी चाहत्यांची चित्रपटगृहात गर्दी जमायची. पण कालांतराने प्रभू देवा याच्यासोबत असलेल्या तिच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगू लागली.

२००९ मध्ये नयनतारा आणि प्रभू देवा यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. ‘विल्लू’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं असं अनेकदा सांगण्यात आलं. ‘विल्लू’ सिनेमाचं दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केलं होतं, तर नयनतारा सिनेमात मुख्य भूमिकेत होती.

जेव्हा नयनतारा आणि प्रभू देवा यांच्यातील नातं नवीन वळण घेत होतं, तेव्हा दिग्दर्शक विवाहित होता. १९९५ मध्ये प्रभू देवा आणि लता यांनी लग्न केलं होतं. प्रभू देवा यांना तीन मुलं आहेत. पण विवाहित असताना देखील प्रभू देवा यांनी दोन वर्ष नयनतारा हिला डेट केलं. २०१० मध्ये एका मुलाखती दरम्यान खुद्द प्रभू देवा यांनी अभिनेत्रीसोबत असलेलं नातं स्वीकारलं होतं.

आता नयनतारा आणि प्रभू देवा त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. नयनतारा पती विग्नेश शिवम आणि दोन जुळ्या मुलांसोबत आनंदी आहेत. प्रभू देवा यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव हिमानी सिंग आहे. हिमानी सिंग हिने काही दिवसांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. खुद्द प्रभू देवा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत आनंद शेअर केला.

Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग
Delhi Election Result : आपच्या सत्तेला भाजपकडून सुरूंग.
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.