AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शाहरुख खानच्या धर्माचा आदर करते याचा अर्थ माझा धर्म…’, गौरी खानचं मोठं वक्तव्य

Shah Rukh Khan - Gauri Khan | 'शाहरुख खानच्या धर्माचा आदर याचा अर्थ माझा धर्म...', शाहरुख आणि स्वतःच्या धर्माबद्दल गौरी जेव्ही झाली होती व्यक्त..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खानची पत्नी गौरी खान हिच्या वक्तव्याची चर्चा...

'शाहरुख खानच्या धर्माचा आदर करते याचा अर्थ माझा धर्म...', गौरी खानचं मोठं वक्तव्य
| Updated on: May 29, 2024 | 9:48 AM
Share

आयपीएल फायनलमुळे अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुन्हा चर्चेत आले आहे. लग्नाच्या 30 वर्षांनंतर देखील शाहरुख – गौरी यांच्यामधील प्रेम कमी झालं नाही. गौरी फायनल दरम्यान आजारी असलेल्या शाहरुखची सतत काळजी घेताना दिसली. दोघांचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एका व्हिडीओ असा देखील आहे ज्यामध्ये गौरी हिने लग्ना धर्म बदलण्यावर वक्तव्य केलं. शिवाय मुलगा आर्यन कोणता धर्म मानतो… यावर देखील गौरी हिने मोठं वक्तव्य केलं होतं.

अनेक दिवसांपूर्वी गौरी अभिनेता हृतिक रोशन याची पहिली पत्नी सुझान खान हिच्यासोबत ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आली होती. तेव्हा गौरी म्हणाली, ‘शाहरुख आणि आर्यन यांच्यामध्ये फार घट्ट नातं आहे. त्यामुळे मला असं वाटायचं आर्यन वडिलांचा धर्म मानेल. आर्यन स्वतः म्हणतो की मी मुस्लिम आहे. जेव्हा तो माझ्या आईला सांगतो तेव्हा ती म्हणते, ‘याचा अर्थ काय?’

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

पुढे गौरी म्हणाली होती, ‘मी शाहरुख खानच्या धर्माचा आदर करते याचा अर्थ असा होत नाही की मी इस्लामचा स्वीकार करेल. मला असं वाटतं प्रत्येकाने आपला धर्म मानयला हवा. कोणत्याच धर्माचा अपमान नाही झाला पाहिजे. ज्याप्रमाणे शाहरुख माझ्या धर्माचा अपमान करत नाही…’ एवढंच नाही तर, शाहरुख खानने देखील धर्मावर मोठं वक्तव्य केलं होतं.

एका शोमध्ये किंग खान म्हणाला होता, ‘आमच्यामध्ये कधी हिंदू – मुस्लिम अशा गोष्ट नव्हती… माझी पत्नी हिंदू, मी मुसलमान आहे आणि आमची मुलं हिंदुस्तान आहे. आमच्या घरात गणपती, होळी, दिवाळी, ईद सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे होतात…’ असं देखील शाहरुख खान म्हणाला होता.

शाहरुख कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या वर्षी बॉलिवूड अनेक हीट सिनेमे दिल्यानंतर किंग खान ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेता लेक सुहाना खान हिच्यासोबत दिसणार आहेत. सोशल मीडियावर  देखील शाहरुख खान कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर देखील किंग खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Follow Us
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!