AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुपरस्टारवर एकतर्फी प्रेम करणं अभिनेत्रीला पडलं महागात; करिअर संपलं, नैराश्यात अडकून नाकारलं लग्न

सत्तरच्या दशकातील ही अभिनेत्री एका बॉलिवूड सुपरस्टारच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र तिचं हे प्रेम एकतर्फीच होतं. या एकतर्फी प्रेमाखातर तिने आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्याच्या निधनानंतर ती नैराश्यात गेली.

सुपरस्टारवर एकतर्फी प्रेम करणं अभिनेत्रीला पडलं महागात; करिअर संपलं, नैराश्यात अडकून नाकारलं लग्न
Sulakshana Pandit, Sanjeev KumarImage Credit source: Facebook
| Updated on: Aug 29, 2023 | 7:05 PM
Share

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांच्या प्रेमकहाण्या चवीने चघळल्या जातात. एकाच चित्रपटात किंवा मालिकेत काम करताना जेव्हा कलाकार एकमेकांसोबत बराच वेळ घालवतात, तेव्हा अनेकदा त्यांच्यात प्रेमाची कळी उमलते. अशावेळी काहींच्या प्रेमाचा प्रवास हा लग्नापर्यंत पोहोचतो. तर काहींच्या नात्यात त्या आधीच दुरावा आला. इंडस्ट्रीत असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी एकतर्फी प्रेमातून कधीच लग्न केलं नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सुलक्षणा पंडित. 70 च्या दशकातील अभिनेत्री सुलक्षणा पंडितने एकतर्फी प्रेमामुळे कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. सुलक्षणाचं हे प्रेम बॉलिवूडमधल्याच एका सुपरस्टारवर होतं. तिने तिच्या करिअरमध्ये जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. मात्र तरीही ती इंडस्ट्रीतील कमनशिबी अभिनेत्री ठरली.

सुपरस्टारवर जडलं प्रेम

रिपोर्ट्सनुसार, सुलक्षणा पंडित अभिनेते संजीव कुमार यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र संजीव कपूर यांनी तिच्याशी लग्न केलं नाही. कारण त्यांचं दुसऱ्या अभिनेत्रीवर प्रेम होतं. ‘उलझन’ या चित्रपटात सुलक्षणा आणि संजीव कपूर यांनी एकत्र काम केलं होतं. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती त्यांच्या प्रेमात पडली. तर दुसरीकडे संजीव कपूर हे दुसऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात होते. त्यांनी त्या अभिनेत्रीला दोन वेळा प्रपोजसुद्धा केलं होतं. मात्र तिने संजीव कपूर यांचं प्रपोजल नाकारलं होतं. यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले आणि आयुष्यभर लग्न न करताच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या याच निर्णयाचा परिणाम सुलक्षणा यांच्यावरही झाला आणि तिनेसुद्धा कधीच कोणाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

एकतर्फी प्रेमातून लग्नच केलं नाही

1985 मध्ये संजीव कुमार यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तेव्हा ते फक्त 47 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर सुलक्षणा नैराश्यात गेली आणि तिने लग्न केलंच नाही. सुलक्षणाची बहीण विजेता पंडितने एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की संजीव कुमार यांच्या निधनानंतर ती पूर्णपणे खचली आणि तेव्हापासूनच ती नैराश्याच्या गर्तेत अडकली.

2006 मध्ये विजेता पंडितने सुलक्षणाला तिच्या घरी आणलं. मात्र सुलक्षणाने स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतलं. ती कोणाचीच भेट घेत नव्हती किंवा कोणाशीच बोलत नव्हती. एकेदिवशी बाथरुममध्ये पाय घसरून तिच्या पायाला दुखापत झाली. यानंतर तिच्यावर चार सर्जरी झाल्या, मात्र त्यामुळे आजही सुलक्षणाला नीट चालता येत नाही.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग