Maharashtra News LIVE : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा, आज होणार फैसला?
Maharashtra News LIVE : आज कोर्टात पक्षाच्या चिन्हावर सुनावणी आहे. यादरम्यानच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा आहेत. आज भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला.

LIVE NEWS & UPDATES
-
नगरसेवकांच्या कार्यालयासमोरच खड्ड्यांचे साम्राज्य! एकता नगर चौकातील रस्त्यामुळे वाहनचालक त्रस्त
डोंबिवली पूर्वेतील एकता नगर चौकात मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा चौक शिवसेनेचे नगरसेवक सूरज मराठे आणि नगरसेविका ज्योती मराठे यांच्या जनसंपर्क कार्यालयालगतच असूनही खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. खड्डे चुकवत रिक्षाचालक, दुचाकीस्वार आणि चारचाकी चालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
-
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय. नाशिककडून आलेला कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेला गेला अन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला, या भीषण धडकेत ट्रक खाली कोसळला अन त्याखाली वेगन-आर कार दबली आहे. सुदैवाने या भीषण अपघात कोणतीही जीवितहानी झालेली आहे.
-
-
शहरातील खड्ड्यांच्या विषयावर होणारी सात तारखेची महासभा होणार आठ तारखेला
नाशिकचे खड्डे आता मुख्यमंत्र्यांच्या दरबारी. महासभा रद्द करून मुंबईत तातडीची बैठक. सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश. नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरमुख्यमंत्री घेणार आढावा
-
डोंबिवली पूर्वेतील झेंडा चौकातील खड्ड्यांनी डोंबिवलीकर हैराण
डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर अर्थात झेंडा चौकातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण चौक खड्डेमय झाला आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालक, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. प्रगती कॉलेजसह तीन ते चार शाळा या परिसरात असल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे. पहाटेपासूनच या चौकात वाहतुकीची वर्दळ सुरू होत असून खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे रस्ते दुरुस्तीसाठी रोड रोलर चौकात उभा असला तरी खड्डे मात्र जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये CJP च्या कोअर कमिटीची आजपासून दोन दिवसीय बैठक
आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर होणार सविस्तर चर्चा. अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन. सौरभ दास, आशुतोष रांका आणि CJP चे पदाधिकारी बैठकीला उपस्थित. CJP ची पुढील दिशा, ध्येय-धोरणे आणि आंदोलनाची भूमिका ठरणार. भविष्यातील आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यावर बैठकीचा मुख्य भर
-
राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज पक्षाच्या चिन्हावर कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्ट यावर काय निर्णय देते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल कॉंग्रेसने धक्कादायक विधान केले. ज्यानंतर मोठा वाद पेटला. राष्ट्रपतीकडून पुण्यात याविरोधात आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली. जय पवार यांनी याबाबत पोस्ट शेअर करत आपला रोष व्यक्त केला. कॉंग्रेसने सुनेत्रा पवार यांना थेट गुंगी गुढिया म्हटले. गुंगी गुढियाच्या विधानावर आम्ही ठाम असल्याचेही कॉंग्रेसने म्हटले. अभिजीत दिपके पुन्हा जंतर मंतरवर जाणार असल्याची माहिती आहे. अभिजीत दिपके यांची भेट संजय शिरसाट यांनी त्यांच्या घरी जाऊन घेतल्याने भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटात तणाव निर्माण झाला. यावर एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली. राज्यात आज भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा अंदाज देण्यात आला. यासह राज्यातील, देश- विदेशातील, क्रीडा, मनोरंजन आणि इतर क्षेत्रातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Aug 05,2026 8:26 AM
