Sonu Nigam यांचा मुलगा दिसतो कसा?, बापासारखा गायक होणार की अभिनेता?, पित्याने पोस्ट करीत केलं लेकाचं कौतूक
गायक सोनू निगम यांचा मुलगा निवान आता मोठा झाला आहे. त्याच्या कामाविषयीची चांगली बातमी खुद्द सोनू निगम यांनी पोस्टद्वारे दिली आहे. बॉलीवूडमध्ये नेपोटिझमचा वाद कायम सुरु असतो. मात्र निवान याने स्वतंत्र कारकीर्द घडवण्याचा चंग बांधला आहे.

प्रख्यात गायक सोनू निगम मध्यंतरी त्यांनी त्यांची सर्जरी सुरु असताना ऑपरेशन थिएटरमध्ये गाणे गाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सोनू निगम यांना यंदाची दिवाळी आनंदाची गेली आहे. त्यांनी आपल्या एका पोस्टमध्ये त्यांच्या १९ वर्षांच्या मुलगा निवान याने त्यांची पहली शॉर्ट फिल्म ‘स्लाईड’ द्वारे म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याची बातमी सर्वांना दिली आहे. सोनू यांनी त्यांची पत्नी मधुरिमा निगम सोबत जॉईंट प्रोजेक्ट करत ही खुशखबरी दिली आहे.मुलगा निवान याच्यात गेल्या काही वर्षांपासून झालेल्या बदलासंदर्भात पिता म्हणून सोनू यांनी कौतूकही केले आहे. त्यांनी निवान निगमच्या लहानपणाच्या परफॉर्मन्सपासून त्याच्या पहिल्या स्वतंत्र म्युझिकल प्रोजेक्टची तयारी संदर्भात माहिती दिली आहे.
निवान याच्या म्युझिक डेब्यूवर सोनू निगम हॅप्पी
आपल्या पोस्टमध्ये सोनूने केवळ मुलगा निवानच्या गाण्यांसदर्भात सांगितलेले नाही तर निवानमध्ये झालेले बदल, त्याचे प्रशिक्षण आणि म्युझिक आणि डान्सिंग स्किल्सला चांगले करण्यासाठी घेतलेल्या कठोर मेहनती संदर्भातही मनमोकळे केले आहे. त्यांनी त्यांचा मुलाच्या सुरुवातीच्या परफॉर्मन्सची झलक देखील पेश केली आहे. ज्यात काही असे क्षण होते ज्यात युजरना निवान अवघा चार वर्षांचा असतानाचा व्हिडिओ पाहायला मिळतोय.
निवानचा म्युझिक डेब्यू
सोनू निगम यानी पोस्टमध्ये निवानच्या आत्मविश्वासाबद्दलच्या प्रगती संदर्भात सांगितले आहे. ते म्हणतात की एक वेळ अशी होती जेव्हा त्यांचा मुलगा पप्पा समोर गायला देखील लाजायचा आणि आज तो व्होकल कोचसोबत काम करत आहे. निवानची तयारीत डान्स रिहर्सल आणि फिटनेस रुटीनचा देखील समावेश आहे.
सोनू निगमची पोस्ट
सोनू निगम यांनी त्यांच्या 19 वर्षांच्या मुलगा निवान याच्या बॉलीवुड डेब्यू संदर्भात पोस्ट केलीय-, “दिवाळीच्या या शुभ आणि पवित्र मुहूर्तावर निवान संगीतविश्वात आपल्या कारकिर्दीची नवी सुरुवात करीत आहे. निवान याने स्वतःचा एक नवा मार्ग शोधण्यासाठी आजोबा आणि वडिलांपेक्षा वेगळी वाट निवडली आहे. एका गुबगुबीत मुलापासून ते एका सडपातळ तरुणात त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे.जो मुलगा पप्पा समोर गायला देखील लाजायचा आणि आज तो व्होकल कोचकडून शिकवलेल्या गाण्यांचा सराव दिवसातील तब्बल 16 तास करत आहे. इतकेच नव्हे तर दिग्गज संगीतकार ‘पू बेअर’ (Poo Bear) यांच्यासोबत स्टुडिओमध्ये एकाच टेकमध्ये अप्रतिम रेकॉर्डिंग करत आहे.”
येथे वाचा पोस्ट –
4 वर्षांचा असताना गायन
सोनू निगम यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की , जो मुलगा कधी तीन मिनिटांच्या जॉगिंगमध्येही थकायचा, तो आज आपल्या कौशल्याला तावून सुलाखून सिद्ध करण्यासाठी तासनतास डान्सची प्रॅक्टीस करत आहे. निवानने आमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप आनंद दिला आहे. चार वर्षांचा असताना स्टुडिओत ‘कोलावेरी डी’ गाणे म्हणण्यापासून ते साडे चार वर्षांत स्टेजवर ‘अभी मुझमें कहीं’ गाण्यापर्यंत, निवानला तुम्हा सर्वांकडून एवढे प्रेम मिळाले आहे की, तो खरोखरच भाग्यवान आहे.