AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif ALi Khan : सैफ अली खानचं इन्स्टाग्रामवर डेब्यू, ना मुलगी, ना बहीण.. आल्या आल्या कोणाला केलं फॉलो ?

इतके वर्ष सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर अखेर, बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान याने इन्स्टाग्रामवर त्याचं अकाऊंट ओपन केलं आहे. पहिल्याच पोस्टमध्ये त्याने पटौदी पॅलेसमधील लायब्ररीतून काही खास फोटो शेअर केलेत. त्याच्या डेब्यून चाहते खूप उत्साहित आहेत. आल्या - अलाया त्याने कोणाल फॉलो केलं ?

Saif ALi Khan : सैफ अली खानचं इन्स्टाग्रामवर डेब्यू,  ना मुलगी, ना बहीण..  आल्या आल्या कोणाला केलं फॉलो ?
Image Credit source: social media
| Updated on: Oct 12, 2026 | 5:16 PM
Share

बॉलीवूड स्टार सैफ अली खानने अखेर सोशल मीडियावर अधिकृतपणे एंट्री केली आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जगापासून नेहमी दोन हात लांब राहणाऱ्या सैफने अखेर आता इन्स्टाग्राम डेब्यू केलं आहे. त्याचसोबत त्याने पहिली पोस्ट करत, त्याचे काही लेटेस्ट फोटोही शेअर केलेत. या फोटोत सैफ, पटौदी पॅलेसच्या लायब्ररीत दिसलाय. बऱ्याच वर्षांनंतर सैफ इन्स्टाग्रामवर आल्याने त्याचे चाहते खूपच उत्सुक असून त्यांनी सैफचं जोरदार स्वागत केलं.

Pataudi Library.. Judging books by their cover.. स्वतःचे काही फोटो शेअर करत सैफ अली खानने ही कॅप्शनही त्यासोबत लिहीली आहे. पहिल्या फोटोत सैफ लायब्ररीमध्ये दिसतोय, तर दुसऱ्या फोटोत तो आरामात बसून पुस्तक वाचताना पाहायला मिळत आहे.

आल्या आल्या कोणाला केलं फॉलो ?

पतौडी कुटुंबातील अनेक सदस्य इन्स्टावर आहेत. पण सोशल मीडियाच्या जगा एंट्री करताच सैफने फक्त एकाच व्यक्तीला फॉलो केलंय. ती व्यक्ती म्हणजे – सैफची पत्नी, अभिनेत्री करीना कपूर खान. खरंतर सैफची बहीण सोहा अली कान, सबा, तसेच कुणाल खेमू, त्याची मुलगी सारा अली खान, हे इतर सदस्यही इन्स्टावर आहेत, पण सध्या तरी सैफ एकाच व्यक्तीला फॉलो करताना दिसतोय, आणि करीनानेही लगेच त्याला फॉलो बॅक केलं. त्याल जवळपास 8 हजार लोकांनी आत्तापर्यंत फॉलो केलंय.

सीक्रेट अकाऊंट चालवायचा सैफ

2024 मध्ये ‘एचटी सिटी’ला दिलेल्या एका मुलाखतीत सैफ अली खानने खुलासा केला होता की, त्याचं एक सीक्रेट इन्स्टाग्राम अकाउंट आहे. या अकाउंटचा वापर तो अधूनमधून केवळ रील्स किंवा इतर कंटेंट पाहण्यासाठी करतो. मात्र, सोशल मीडियाचं व्यसन खूप लवकर लागतं, असंही त्याने मान्य केलं होतं. त्यामुळेच तो सार्वजनिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून दूर राहणं पसंत करत होता. मात्र आता त्याने अखेर इन्स्टावर डेब्यू केलं आहे.

सैफला आवडत नाही सोशल मीडिया

याबद्दल बोलताना सैफ म्हणाला होता, “ माझ्या फोनमध्ये इन्स्टाग्राम ॲप आणि एक सीक्रेट अकाउंट आहे. मी अधूनमधून ते वापरतो, पण मला त्यात फारशी मजा येत नाही. प्रत्येत वेळेस थोड्या वेळ ते इन्स्टाग्राम पाहिल्यानंतर ते डिलीट करून टाकावं, असं मला वाटतं; पण तरीही मी ते डिलीट करू शकत नाही. मला अशा भानगडीत पडायचं नाही, जिथे मला इतरांच्या गोष्टी किंवा प्रोजेक्ट्सचं प्रमोशन करावं लागेल. माझ्याकडे कोणी प्रमोशनसाठी येत नाही, याचं मला समाधान वाटतं. कारण मी सोशल मीडियावर नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मला खूप शांतता मिळते.” असंही सैफने सांगितलं होतं.

सैफच्या कामाबद्ल सांगायचं झालं तर नुकताच तो प्रियदर्शन यांच्या ‘हैवान’ चित्रपटात दिसला होता, ज्यात अक्षय कुमारची देखील मुख्य भूमिका होती, 17 वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली होती. मात्र बॉक्स ऑफीसवर ही फिल्म फार कमाल करू शकली नाही. हाँ चित्रपट फ्लॉप ठरला.

Follow Us
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...