बॉलिवूडमधला अभिनेता साकारणार लिंगपिसाट खरातची भूमिका, सिनेमाची स्टारकास्ट सर्वात मोठी

लिंगपिसाट अशोक खरातच्या 'खरात फाईल' प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल' सिनेमा लवकरच येत आहे. यात खरातची भूमिका एका मोठ्या बॉलिवूड अभिनेत्याकडून साकारली जाईल, तर रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दीपाली सय्यद दिसणार आहेत.

बॉलिवूडमधला अभिनेता साकारणार लिंगपिसाट खरातची भूमिका, सिनेमाची स्टारकास्ट सर्वात मोठी
Deepali Sayad
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 28, 2026 | 5:50 PM

लिंगपिसाट अशोक खरातच्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरून गेला आहे. संपर्कात आलेल्या असंख्य महिलांशी त्याने लैंगिक संबंध ठेवल्याचं उघड झालं आहे. त्याचे हे व्हिडीओही व्हायरल झाल्याने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या प्रकरणी खरात तुरुंगात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाला खरात फाईल म्हणूनही संबोधलं जात होतं. आता या प्रकरणावर सिनेमा येत आहे. या सिनेमात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार आहेत. तर लिंगपिसाट खरातची भूमिका हिंदीतील बडा अभिनेता साकारणार आहे.

महाराष्ट्र एपस्टिन फाईल या नावाने हा सिनेमा येत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक स्वरुप सावंत आहेत. या सिनेमात मोठी आणि तगडी स्टारकास्ट असणार असल्याचं स्वरुप सावंत यांनी सांगितलं. तसेच लिंगपिसाट खरातची भूमिका हिंदीतील चेहरा साकारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दीपाली सय्यदच दिसणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या सिनेमातून भोंदूगिरीवर प्रहार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मॅडम कुणाला घाबरत नाहीत

या सिनेमात दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर दीपाली सय्यद यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. या सिनेमात तुम्ही काम करू नका, असंही त्यांना सांगितलं गेलं आहे. स्वत: दीपाली सय्यद यांनीच याबाबतची माहिती दिली आहे. त्यावरही सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपाली मॅडम कुणालाही घाबरत नाहीत. कलाकारांनी कुणालाच घाबरू नये. त्या स्वतः राजकारणामध्ये असल्यामुळे राजकीय दबावाला घाबरत नाहीत. अभिनेत्री दिपाली सय्यद याच रूपाली चाकणकर यांचा रोल करणार आहेत, असं सावंत म्हणाले.

फडणवीस आमच्यासोबत

आम्हाला धमक्यांचे फोन आले तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या सोबत आहेत. फडणवीस यांनीच भोंदूगिरी खणून काढली आहे. त्यांनीच या प्रकरणात पुढाकार घेऊन या प्रकरणाला न्याय दिला आहे. त्यामुळेच कलाकारांनी कधीही घाबरू नये, असं सांगतानाच भोंदू बाबाला बळी पडू नये, हा संदेशच आम्ही सिनेमाच्या माध्यमातून समाजाला देत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us