AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चनपासून तृप्ती डिमरीपर्यंत, बॉलिवूड स्टार्स रिअल इस्टेटमध्ये का करतायत मोठी गुंतवणूक?

बॉलीवूड स्टार्स मुंबई आणि इतर मेट्रो शहरांमधील प्राइम लोकेशन्समध्ये प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक करण्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावे आहेत. पण एवढ्या मोठ्या संख्येनं सेलिब्रिटी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक का करत आहेत? पाहुयात

अमिताभ बच्चनपासून तृप्ती डिमरीपर्यंत, बॉलिवूड स्टार्स रिअल इस्टेटमध्ये का करतायत मोठी गुंतवणूक?
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 28, 2024 | 8:08 PM
Share

बॉलीवूड स्टार्स मुंबई आणि इतर मेट्रो शहरांमधील प्राइम लोकेशन्समध्ये प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहेत. मालमत्तेत केलेली सुरक्षित गुंतवणूक हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. अमिताभ बच्चनपासून ते तृप्ती डिमरीपर्यंत सर्वजण प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत आहेत.

बॉलिवूड स्टार्सची रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक

बॉलिवूड स्टार्स त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि लक्झरी प्रॉपर्टीजसाठी नेहमीच चर्चेत असतात. अलिकडच्या काही महिन्यांत अनेक नामवंत स्टार्स आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबई आणि आसपासच्या परिसरात प्रचंड मालमत्ता खरेदी केल्याच्या चर्चा आहेत. या यादीत अमिताभ बच्चन आणि तृप्ती डिमरी यांच्यासह अनेक कलाकारांचा  समावेश आहे.

रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करणारे सेलिब्रिटी कोण आहेत ते पाहुयात

अमिताभ आणि अभिषेक बच्चन

अमिताभ बच्चन यांनी सप्टेंबरमध्ये इटर्निया, मुलुंड पश्चिम येथे 2.54 कोटींची मालमत्ता खरेदी केली आहे. ज्यासाठी त्यांनी 15.23 लाख शुल्क भरले आहे. तर, मुलगा अभिषेक बच्चन यानेही याच इमारतीत 2.22 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आणि 13.33 लाख मुद्रांक शुल्क भरले आहे.

कंगना राणौत

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने ओशिवरा येथे 1.56 कोटींची मालमत्ता खरेदी केली, ज्यासाठी तिने 9.3 लाख मुद्रांक शुल्क भरले आहे. सध्या कंगना चित्रपटांपासून दूर आहे आणि राजकारणात जास्त सक्रिय आहे. यासोबतच ती सतत प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहे.

शाहिद कपूर

चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहिद कपूरने 360 वेस्ट ओबेरॉय रियल्टी, लोअर परेलमध्ये 58.66 कोटींची मालमत्ता खरेदी केली. त्यासाठी त्याने 1.7 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले.

तृप्ती डिमरी आणि आमिर खान

‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने जूनमध्ये कार्टर रोड, वांद्रे येथे 14 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. तसेच, चित्रपटांपासून ब्रेकवर असलेल्या आमिर खानने वांद्रे येथील बेला विस्टा अपार्टमेंटमध्ये 9.76 कोटी किमतीचे अपार्टमेंट खरेदी केले आहे यासाठी त्याने 58.54 लाख मुद्रांक शुल्क भरले आहे.

दीपिका पदुकोण आणि अंजू सिंग

अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचे वडील प्रकाश पदुकोण यांच्यासोबत वांद्रे येथे 17 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. यानंतर, तिचा पती रणवीर सिंगची आई अंजू सिंग यांनी देखील त्याच इमारतीत 19 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. यासाठी त्यांनी 95 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.

बॉलीवूड स्टार्स मुंबई आणि इतर मेट्रो शहरांमधील प्राइम लोकेशन्समध्ये प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत आहेत. मालमत्तेत केलेली सुरक्षित गुंतवणूक हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?