AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बी प्रेमानंद महाराजांच्या दरबारात; म्हणाले मेरा जीवन सार्थक हो गया, सोशल मीडियात तुफान चर्चा, Video पाहाच

Big B Amitabh Bachchan at Premanand Maharaj Darbar : बॉलिवूडचे सुपरस्टार बिग बी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने अनेकांच्या मनात कालवाकालव झाली. तर दुसरीकडे प्रेमानंद महाराजांच्या दरबारात बिग बी काय करताय असा सवाल अनेकांना पडला. त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

बिग बी प्रेमानंद महाराजांच्या दरबारात; म्हणाले मेरा जीवन सार्थक हो गया, सोशल मीडियात तुफान चर्चा, Video पाहाच
| Updated on: Feb 25, 2025 | 10:54 PM
Share

बॉलिवूडचे  सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने अनेकांना धक्का बसला. त्यांच्या जीवनाविषयीच्या पोस्टमुळे अनेकांच्या मनात कालवाकालव झाली. बिग बी अशा पोस्ट का करत आहेत, यावरून सोशल मीडियात एकच चर्चा रंगली. तर दुसरीकडे प्रेमानंद महाराजांच्या दरबारात बिग बी काय करताय असा सवाल अनेकांना पडला. त्यांना आश्चर्य वाटले. हा व्हिडिओ कधीचा आहे हे अजून समोर आलेले नाही. पण तो सध्या समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

प्रेमानंद महाराजांचा मोठा चाहता वर्ग आहे. प्रेमानंद महाराजांच्या पदयात्रेत त्यांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची अलोट गर्दी होते. तर त्यांच्या दरबारात सुद्धा अनेक सेलिब्रिटी, बड्या हस्ती हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहली याने पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलाबाळासह दरबारात हजेरी लावली होती. इतर ही अनेक क्षेत्रातील दिग्गज दरबारात त्यांच्या समस्या, प्रश्न मांडतात. त्यावर महाराज उत्तर देतात.

बिग बी दरबारात?

एका सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात बिग बी अमिताभ बच्चन हे प्रेमानंद महाराजांच्या दरबारात आल्याचे दिसते. पण अर्थात ते अमिताभ बच्चन यांच्या सारखे हुबेहुब दिसणारे शशिकांत बिडवाल हे आहेत. ते कुटुंबियांसह दरबारात आले होते. महाराजांचे शिष्य त्यांचा परिचय करून देताच, तुम्ही तर अमिताभ बच्चन सारखेच दिसतात, अशी पुस्ती महाराज जोडताना दिसतात.

कोविड काळातील कार्याचा गौरव

यावेळी शशिकांत बिडवाल यांनी कोविड काळातील लोकांच्या मनोस्थितीची माहिती देत आपण या रुग्णांना कसा दिलासा दिला. त्यांना कशी मदत केली. त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवला. त्यांना हिम्मत कशी दिली. याची माहिती महाराजांना दिली. आपण अमिताभ बच्चन असल्याचे वा त्यांचे डुप्लिकेट असल्याचे सांगितले नाही. पण कोविड रुग्णांचे व्हिडिओ द्वारे मनोबल वाढवल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या या कृतीने अनेकांचे मनोबल उंचावले. अनेक रुग्णांमध्ये हिम्मत आली. त्यांना बळ आले. त्यांच्यात उत्साह संचारला. या रोगाला तोंड देण्याची शक्ती त्यांना मिळाल्याचे बिडवाल यांनी सांगताच, महाराजांनी त्यांच्याकडे कौतुकाने पाहिले. त्यांच्या या कार्याचा प्रेमानंद महाराजांनी विशेष गौरव केला.

प्रेमानंद महाराजांनी दिला हा मंत्र

शशिकांत बिडवाल यांनी महाराजांना तुमचे दर्शन घेऊन जीवन सार्थक झाल्याचे म्हटले. तर आता तुम्ही मला काय आदेश द्याल अशी विचारणा केली. त्यावर तुम्ही जे कार्य करतात. त्यात देवाचे पण नामस्मरण करा. लोकांनाही त्यामुळे प्रेरणा मिळेल असे महाराज म्हणाले. या विनोद पेरण्याच्या कार्यात देवाचे नाव घेण्याचे महाराजांनी त्यांना सांगितले.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.