Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नात असेल कडक सुरक्षाव्यवस्था; बोलावण्यात आले 200 बाऊंसर्स

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) अवघ्या काही दिवसांत आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. येत्या 13 ते 17 एप्रिलदरम्यान बॉलिवूडमधील ही बहुचर्चित जोडी विवाहबद्ध होणार असल्याचं कळतंय.

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नात असेल कडक सुरक्षाव्यवस्था; बोलावण्यात आले 200 बाऊंसर्स
Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Latest Updates
Image Credit source: Instagram
स्वाती वेमूल

|

Apr 11, 2022 | 3:58 PM

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) अवघ्या काही दिवसांत आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. येत्या 13 ते 17 एप्रिलदरम्यान बॉलिवूडमधील ही बहुचर्चित जोडी विवाहबद्ध होणार असल्याचं कळतंय. या लग्नसोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. रणबीर-आलिया मुंबईतच लग्नगाठ बांधणार आहेत. यासाठी कडक सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर-आलियाच्या लग्नात सुरक्षेसाठी 200 बाऊंसर्स बोलावण्यात आले आहेत. आलियाचा चुलत भाऊ राहुल भट्ट याने याबद्दलची माहिती दिली. “रणबीर-आलियाच्या लग्नात सुरक्षेची जबाबदारी युसुफ भाईने उचलली आहे. त्याच्याकडे 9/11 एजन्सी हे मुंबईतील सर्वोत्तम सुरक्षा दल आहे. या एजन्सीमधून सुमारे 200 बाऊन्सर्स बोलावण्यात आले आहेत. माझ्या टीममधील 10 मुलांनाही पाठवलं जाईल”, असं तो म्हणाला. (Ranbir Alia Wedding)

कृष्ण राज बंगला आणि आर. के. स्टुडिओलाही रोषणाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या रोषणाईचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. रणबीर आणि आलिया यांच्या बंगल्याच्या इंटेरिअरचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या बंगल्यालाही रोषणाई करण्यात आली आहे. लग्नानंतर हे दोघं याच बंगल्यात राहणार असल्याचं म्हटलं जातंय.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी नुकतीच लग्नाविषयीची माहिती दिली. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की 14 एप्रिल रोजी रणबीरच्या वांद्रे इथल्या ‘वास्तू’ या घरात लग्न पार पडेल. तर 13 एप्रिल रोजी मेहंदीचा कार्यक्रम असेल. आलिया आणि रणबीर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांनी पहिल्यांदा एकत्र हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली.

हेही वाचा:

रुपाली चाकणकर यांच्या मुलाचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

Aai Kuthe Kay Karte: ‘त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला’; सेटवरील खास व्यक्तीसाठी मिलिंद गवळी यांची पोस्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें