Sonu Sood Reaction : एका व्यक्तीने सोनू सूदकडे 1 कोटी मागितले, अभिनेत्याने दिले हे खास उत्तर…

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद अनेकदा लोकांना मदत करतो. अलीकडेच लॉकडाऊन दरम्यान सोनू सूदने सोशल मीडियाद्वारे लाखो लोकांना मदत केली. ज्यामुळे तो चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. सोनूला सोशल मीडियावर लोक अनेक वेळा विचित्र मागण्या करत ट्विट करतात.

Sonu Sood Reaction : एका व्यक्तीने सोनू सूदकडे 1 कोटी मागितले, अभिनेत्याने दिले हे खास उत्तर...
सोनू सूद

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद अनेकदा लोकांना मदत करतो. अलीकडेच लॉकडाऊन दरम्यान सोनू सूदने सोशल मीडियाद्वारे लाखो लोकांना मदत केली. ज्यामुळे तो चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. सोनूला सोशल मीडियावर लोक अनेक वेळा विचित्र मागण्या करत ट्विट करतात. नुकताच एका युजर्सने सोनुला एक विशेष मागणी केली आहे. ज्याला सोनूने एक खास उत्तरही दिले आहे, जे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (A person asked Sonu Sood for 1 crore, the actor gave a special answer)

अलीकडेच ट्विटरवर एका युजर्सने सोनू सूदकडून एक कोटी रुपयांची मागणी केली. महेंद्र दुर्गे नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर एक ट्विट करत लिहिले की, “सोनू सूद सर, 1 कोटी मला द्या ना…” या यूजर्सचे ट्विट वाचल्यानंतर, सोनू सूदने त्याला उत्तर देत लिहिले आहे की, “फक्त एक कोटी रुपये? थोडे जास्त मागितले असते. हे ट्विट लिहिल्यानंतर सोनू सूदने एक हसणारे इमोजी देखील शेअर केले आहे. सोनू सूदचे हे ट्विट सोशल मीडियावर मात्र, चांगलेच व्हायरस होत आहे.

कोरोना काळात जगातील अनेक लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. या काळात सोनू सूदने लोकांना मदतीसाठी हात पुढे केला होता. लाखो लोकांना त्याने कोरोना काळात मदत केली. तसेच आताही तो अनेकांची मदत करतो. अनेक लोक त्याच्याकडे अनेक प्रकारची मदत मागतात.

देशाच्या वेगवेगळ्या भागात अडकलेली मजुरांना, प्रवाशांना सोनूने रेल्वे आणि बसच्या माध्यमातून त्यांच्या घरी सुखरूप पोहचवले. त्याचवेळी देशाबाहेर अडकलेल्या विद्यार्थांची भारतात येण्याची सोयही त्याने स्वःखर्चातून केली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात परतण्यासाठी त्याने थेट विमानांची सोय केली. इतक्यावरच त्याचे मदत कार्य थांबले नसून, खेडोपाड्यात राहणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, इतर वैद्यकीय मदत करण्यासाठीदेखील सोनू सूदने पुढाकार घेतला आहे.

संबंधित बातम्या : 

Rakhi Sawant : राखी सावंतनं सलमान खान, सोहेल खान आणि विकास गुप्ता यांना बांधली राखी, शेअर केला खास व्हिडीओ

‘शेरशाह’ पाहून कमल हासनही सिद्धार्थ-कियाराचे झाले फॅन, म्हणाले…

Kamaal R Khan : केआरकेचा नवा दावा म्हणाला, ‘अक्षय कुमार लवकरच अफगाणिस्तानवर चित्रपट बनवणार’

(A person asked Sonu Sood for 1 crore, the actor gave a special answer)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI