अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या रूममध्ये चोरी, काय गेलं चोरीला, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. नुकताच आता श्रद्धा कपूरचा स्त्री 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे तिचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. श्रद्धा कपूर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली. चित्रपटाच्या शूटिंगवर जात असताना तिच्या एका गोष्टीची चोरी केल्याचं तिने सांगितलं.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रीचा स्त्री 2 हा चित्रपट धमाका करताना दिसतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त असा प्रतिसाद मिळालाय. रिलीज होऊन चार दिवस झाले नाहीत तोवरच या चित्रपटाने तब्बल 177.42 कोटी कमाई केलीये. हा चित्रपट पुढील काही दिवसांमध्ये तूफान कामगिरी करताना दिसले. विशेष म्हणजे श्रद्धा कपूर या चित्रपटाचे चांगलेच प्रमोशन करतानाही दिसली. श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसते. श्रद्धा कपूर ही फक्त तिच्या चित्रपटामुळेच नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. श्रद्धा कपूर हिचे ब्रेकअप झाल्याची सातत्याने चर्चा रंगताना दिसतंय. श्रद्धा कपूर हिने बॉयफ्रेंडला सोशल मीडियावरून अनफॉलो देखील केले.
श्रद्धा कपूर हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने काही मोठे खुलासे केले. श्रद्धा कपूर म्हणाली की, स्त्री 2 चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी पोहोचले. त्यावेळी माझ्या रूममध्ये दोन माकड आली. हेच नाही तर त्यांनी माझी अत्यंत महत्वाची गोष्टही चोरून नेली. त्यावेळी मी सोशल मीडियावर तशी पोस्ट देखीस शेअर केली होती.
श्रद्धा कपूर म्हणाली की, चित्रपटाच्या शूटिंगवर जात असताना मी माझा आवडला पदार्थ म्हणजे बाकरवडी सेटवर घेऊन गेले. त्यावेळी माझ्या रूममध्ये दोन माकड शिरले आणि त्यांनी माझी बाकरवडी घेऊन फरार झाले. मी काहीही करून त्यांना रोखू देखील शकले नाही. त्यांनी माझी बाकरवडी चोरल्यानंतर मला वाईट देखील वाटल्याचे श्रद्धा कपूर हिने म्हटले.
आता श्रद्धा कपूर हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. श्रद्धा कपूर ही अत्यंत लग्झरी लाईफ जगते. मुंबईमध्ये श्रद्धा कपूर हिचे अत्यंत आलिशान असे घर आहे. फक्त घरच नाही तर श्रद्धा कपूर हिच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे. श्रद्धा कपूर हिचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसत आहेत. आता तिचा स्त्री 2 चित्रपट नवीन काय रेकॉर्ड तयार करते हे पाहण्यासारखे ठरेल.
श्रद्धा कपूर ही गेल्या काही वर्षांपासून राहुल मोदी याला डेट करत होती. मात्र, सतत राहुल मोदी आणि श्रद्धा कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगताना दिसत आहेत. आता श्रद्धा कपूर ही इंस्टाग्रामवर राहुल मोदी याला फॉलो करत नाहीये. मात्र, अजूनही राहुल मोदी हा श्रद्धा कपूर हिला फॉलो करतो. मात्र, आपल्या ब्रेकअपच्या चर्चांवर भाष्य श्रद्धा कपूर हिच्याकडून करण्यात नाही आले.
