‘झुंड’मधील बिग बींचं अभिनय पाहून चक्रावला आमिर; म्हणाला…

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पहायला मिळतो. 'पिंक', 'बदला', 'चेहरे' या अलीकडच्या त्यांच्या चित्रपटांमधील अभिनयाचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतील.

'झुंड'मधील बिग बींचं अभिनय पाहून चक्रावला आमिर; म्हणाला...
Amitabh Bachchan and Aamir KhanImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 11:08 AM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पहायला मिळतो. ‘पिंक’, ‘बदला’, ‘चेहरे’ या अलीकडच्या त्यांच्या चित्रपटांमधील अभिनयाचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतील. बिग बींनी त्यांच्या करिअरमधील एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्यातच आत त्यांच्या आणखी एका भूमिकेची भर पडली आहे. ती म्हणजे ‘झुंड’मधली (Jhund) विजय बारसे यांची. सोनसाखळी चोरणाऱ्या, गांजा विकणाऱ्या, गुंडगिरी करणाऱ्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांची फुटबॉल टीम बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विजय यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट असून नुकतंच आमिर खानसाठी (Aamir Khan) या चित्रपटाच्या खासगी स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. हा चित्रपट आणि त्यातील बिग बींचं अभिनय पाहून आमिर अक्षरश: चक्रावला.

काय म्हणाला आमिर खान?

“चित्रपटात बच्चनसाहेबांनी अप्रतिम काम केलंय. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार चित्रपट केले आहेत. पण हा त्यांच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे,” असं आमिर यावेळी म्हणाला. आमिरने यावेळी नागराज मंजुळेंचंही तोंडभरून कौतुक केलं. “गेल्या 20-30 वर्षांत जे आमच्याकडून झालं नाही, ते नागराजने करून दाखवलं”, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. ‘झुंड’मध्ये भूमिका साकारलेल्या मुलांचीही भेट त्याने घेतली.

‘झुंड’च्या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. येत्या ४ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकारांचे चेहरे पहायला मिळतात. झुंडच्या निमित्ताने ‘सैराट’ या चित्रपटाची टीम म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

सत्य घटनेवर आधारित चित्रपट

अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा वेळ घेतला. बिग बींना नजरेसमोर ठेवूनच त्यांनी ही स्क्रीप्ट लिहिली.

संबंधित बातम्या: मराठमोळ्या नागराज मंजुळेंसाठी अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय; बिग बींचं कौतुक करावं तेवढं कमी!

संबंधित बातम्या: “20-30 वर्षांत जे आमच्याकडून नाही झालं, ते नागराजने करून दाखवलं”; आमिर खानचे डोळे पाणावले

संबंधित बातम्या: भारत मतलब? नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा याड लावणारा ट्रेलर एकदा पाहाच!

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.