AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drug Case | ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला जामीन मंजूर, पासपोर्ट न्यायालयात जमा करावा लागणार!

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या स्टार्सची नावे समोर आली होती. अशा परिस्थितीत अभिनेता गौरव दीक्षित (Gaurav Dixit) याला देखील काही काळापूर्वी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता आज (24 सप्टेंबर) अभिनेता गौरव दीक्षितला न्यायालयातून जामीन मिळाला आहे.

Drug Case | ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला जामीन मंजूर, पासपोर्ट न्यायालयात जमा करावा लागणार!
Gaurav Dixit
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 12:05 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणात अनेक बड्या स्टार्सची नावे समोर आली होती. अशा परिस्थितीत अभिनेता गौरव दीक्षित (Gaurav Dixit) याला देखील काही काळापूर्वी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता आज (24 सप्टेंबर) अभिनेता गौरव दीक्षितला न्यायालयातून जामीन मिळाला आहे.

बातमीनुसार, मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेता गौरव दीक्षितला काही नियम आणि अटींच्या आधारे जामीन मंजूर केला आहे. इतकेच नाही तर 50,000 रुपयांचे वैयक्तिक रोख रक्कम भरल्यानंतर, त्याची जामिनावर सुटका झाली आहे..

गौरव दीक्षितला मिळाला जामीन

या प्रकरणात, कोर्टाने म्हटले आहे की, आरोपपत्र दाखल होईपर्यंत गौरव दीक्षित यांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत एनसीबी कार्यालयात हजेरी नोंदवावी लागेल. यासह, त्याला (अभिनेता गौरव दीक्षित) आपला पासपोर्ट तपास अधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल.

एवढेच नाही, तर आता अभिनेता गौरव दीक्षित कोर्टाच्या परवानगीशिवाय मुंबई शहर सोडू शकत नाही. गौरव दीक्षितला एनसीबीने 27 ऑगस्ट रोजी अटक केली होती. ड्रग प्रकरणात अभिनेता एजाज खानने दिलेल्या माहितीच्या आधारे गौरवला अटक करण्यात आली. मात्र, एजाज खान अजूनही तुरुंगात आहे आणि त्याला जामीन मिळालेला नाही. पण आजचा दिवस गौरव दीक्षितसाठी खरोखरच दिलासा देणारा आहे. आता गौरवला काही न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल.

एवढेच नाही, तर तुम्हाला सांगू की NCB ने गौरव दीक्षित यांच्या घरातून एमडी आणि चरस जप्त केले होते, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. गौरव दीक्षित एक टीव्ही कलाकार आहे आणि त्याने चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.

गौरव दीक्षित याची कारकीर्द

गौरवने ‘द मॅजिक ऑफ सिनेमा’, ‘दहेक: द रेस्टलेस माइंड’ आणि ‘बॉबी: लव्ह अँड लस्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये चाहत्यांसमोर आपला अभिनय सादर केला आहे. एवढेच नाही तर गौरवने सीता-गीता सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. छाप्यांदरम्यान, एनसीबीने त्याच्या घरातून एमडी, एमडीएए आणि इतर अनेक बंदी घातलेली, मादक पदार्थांसारखी औषधे जप्त केली होती.

ड्रग्स पेडलर्सकडून मिळाली माहिती

मागील काही दिवसांपासून NCB ने ड्रग्स तस्करीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईमध्ये NCB च्या अधिकाऱ्यांनी 15 पेक्षा अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक केली आहे. NCB चे अधिकारी या ड्रग्स तस्करांची चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान ड्रग्स तस्करीमध्ये अभिनेता अरमान कोहलीचा समावेश असल्याची माहिती NCB ला मिळाली. त्यानंतर याच माहितीच्या आधारे एनसीबीने अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी केली. या कारवाईत एनसीबीला अरमानच्या घरी ड्रग्स सापडले होते.

अरमानकडे सापडलं अमेरिकन कोकेन

NCBनं अरमानच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्याच्याकडे ‘अमेरिकन कोकेन’ सापडलं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे ‘अमेरिकन कोकेन’ विशेष आणि महागड असतं त्यामुळे हे अरमानकडे आलं कसं याबद्दल आता तपास सुरू करण्यात आला आहे. आता ड्रग्स तस्करांची कोणती गॅंग यात सहभागी आहे, हे ड्रग्स कसं आणलं जातं हे शोधण्यावर आता एनसीबीचा भर असणार आहे.

हेही वाचा :

Bigg Boss 15 Contestant | ‘तारक मेहता..’ची निधी भानुशाली ते शमिता शेट्टी, ‘बिग बॉस 15’ घरात कोण कोण होणार कैद?

Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’मध्ये शमिता शेट्टी, निशांत भट्टसह झळकणार ‘हे’ कलाकार, होणार धमाल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.