AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खान याने दिले भन्नाट उत्तर, अभिनेता म्हणाला अगोदर पठाण नंतर हनीमून

इतकेच नाहीतर शाहरुख खान हा त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नाची देखील उत्तरे देत आहे. शाहरुख खान दरवेळीप्रमाणे चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत नाहीये.

Shah Rukh Khan | चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खान याने दिले भन्नाट उत्तर, अभिनेता म्हणाला अगोदर पठाण नंतर हनीमून
| Updated on: Jan 24, 2023 | 3:58 PM
Share

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी म्हणजे उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. शेवटी आता काही तास पठाण चित्रपट (Movie) रिलीज होण्यास उरले आहेत. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड क्रेझ बघायला मिळते आहे. चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. इतकेच नाहीतर शाहरुख खान हा त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नाची देखील उत्तरे देत आहे. शाहरुख खान दरवेळीप्रमाणे चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत नाहीये.

नुकताच Ask SRK सेशनमध्ये शाहरुख खान याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. शाहरुख खान याच्या एका चाहत्याने एक मजेदार प्रश्न शाहरुख खान याला विचारला. या प्रश्नाचे उत्तर शाहरुख खान याने देखील मजेदार शैलीमध्ये दिले.

Ask SRK सेशनमध्ये शाहरुख खान याच्या चाहत्याने विचारले की, मागच्या आठवड्यामध्ये माझे लग्न झाले असून मी हनीमूनसाठी जाऊ की, पठाण चित्रपट बघायला जाऊ…यावर अत्यंत हटके शैलीमध्ये शाहरुख खान याने उत्तर दिले.

शाहरुख खान म्हणाला की, एका आठवड्यापूर्वी तुझे लग्न झाले आहे ना? मग हनीमूनला इतके दिवस का नाही गेला…आता बायकोला घेऊन अगोदर पठाण चित्रपट बघायला जा…आणि नंतर हनीमूनसाठी जा…

आता शाहरुख खान याची हिच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. Ask SRK सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तर कायम देतो. या सेशनमध्ये काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट हिने देखील काही प्रश्न हे शाहरुख खान याला विचारले होते.

पठाण चित्रपटामधील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. इतकेच नाहीतर अनेकांनी थेट चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद सुरू आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?