Pathan | पठाण चित्रपट बॉलिवूडची शान बनणार? शाहरुखने आखला मोठा प्लॅन!

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan)  चित्रपट पठाणची (Pathan) चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत, ज्यांनी यापूर्वी वॉरसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत.

Pathan | पठाण चित्रपट बॉलिवूडची शान बनणार? शाहरुखने आखला मोठा प्लॅन!
‘पठाण’ या चित्रपटासाठी बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खाननं 120 कोटी मानधन घेतलं आहे.

मुंबई : शाहरुख खानचा (Shahrukh Khan)  चित्रपट पठाणची (Pathan) चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत, ज्यांनी यापूर्वी वॉरसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. पठाण हा चित्रपट एक मोठा मल्टीस्टारर चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहेत. हा चित्रपट खास करण्यासाठी शाहरुख आणि चित्रपटाचे निर्माते खूप मोठी योजना आखली आहे. (Shahrukh Khan has a big plan for the movie Pathan)

या चित्रपटाचे शूटिंग भारतातच नाहीतर जगातील वेगवेगळ्या प्रसिध्द ठिकाणी सुरू आहे. बुर्ज खलिफा तेथे मार्चमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ आनंद, आदित्य चोप्रा आणि शाहरुख खान अ‍ॅक्शन सिन करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचा सेटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओंमध्ये शाहरुख एका फिरत्या ट्रकच्या वर जबरदस्त अ‍ॅक्शन सीन करताना दिसत होता.

दीपिका पादुकोणने मुंबईत या चित्रपटाचा सिक्वेन्स शूट केला होता आणि आता लवकरच जॉन अब्राहम आणि शाहरुख यांच्यात अ‍ॅक्शन शूट करतील. मात्र, जॉन अब्राहमला पठाण चित्रपटाचे शूट पूर्ण करण्यासाठी वेळ मिळत नाहीये. जॉन अब्राहम सध्या दिल्लीत आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत त्याने आगामी चित्रपट ‘सत्यमेव जयते’ चे शूटिंग पूर्ण केले आहे. जॉनसाठी, 2018-2019 हे एक अतिशय चांगले गेले कारण त्याचे 2 मोठे चित्रपट प्रदर्शित झाले होते.

संबंधित बातम्या : 

पडद्यावर आदर्श बहु, वास्तवात संसाराचे तीन तेरा, एकदा मोडलं दुसऱ्यांदा बोहल्यावर, टीव्ही हिरोईन्सची कहाणी

कंगनाची भावंडांवर गिफ्ट्सची खैरात, रंगोलीसह चौघांना चार कोटींचे आलिशान फ्लॅट्स

अंकिता लोखंडेची बॉयफ्रेंड विकी जैनसोबत गोवा ट्रीप, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा!

(Shahrukh Khan has a big plan for the movie Pathan)

Published On - 2:56 pm, Tue, 2 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI