अंकिता लोखंडेची बॉयफ्रेंड विकी जैनसोबत गोवा ट्रीप, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा!

अंकिता लोखंडेची बॉयफ्रेंड विकी जैनसोबत गोवा ट्रीप, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 01, 2021 | 6:24 PM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. अंकिता सोशल मीडियावर तिचा प्रियकर विकी जैन बरोबर फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. अंकिताचे नुकताच गोवा ट्रीपचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये प्रियकर विकी जैन आणि कुटूंबासमवेत अंकिता दिसत आहे. एका फोटोमध्ये अंकिता आणि विकी दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोमध्ये अंकिताचे आई-वडिल भाऊ, बहिण आणि विकी जैन दिसत आहेत. (Photos of Ankita Lokhande and her boyfriend Vicky Jain’s Goa tour have gone viral on social media)

अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या कनेक्टमध्ये असते. ती काय करते?, तिचं शेड्युल कसं असतं? या पुढचे अपकमिंग प्रोग्राम काय आहेत? याची माहिती ती आपल्या फॅन्सला सोशल मीडियावरुन माहिती देत असते. मात्र, मध्यंतरी सोशल मीडियावर अंकिताचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये अंकिताने हाताला मेंहदी लावलेली होती. यामुळे चाहते असा अंदाजा लावताना दिसत होते की, अंकिताने गुपचूप मेहंदीच्या कार्यक्रम आणि रोका सेरेमनी केली आहे.

चाहेत तिला विकी जैनसोबत लग्न करणार आहे का असा प्रश्न देखील विचारताना दिसले होते. अंकिता लोखंडे आणि तिच्या बहीणीने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरी वर काही फोटो शेअर केले होते. त्यामुळे अंकिताच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले होते. अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)काही वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.

एका टीव्ही सिरियलमध्ये त्यांची ओळख झाली होती. पुढे ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांचर प्रेमात झालं. मग गाठीभेटी वाढल्या साहजिकच एकमेकांच्या घरी जाणं येणं झालं. काही वर्षांपूर्वी अंकिता सुशांतच्या पाटन्याच्या घरी गेली होती. यावेळी तिथे सुशांतचे सगळे कुटुंबीय होते. त्यांच्या कुटुंबीयांनाही अंकिता आणि सुशांतच्या नात्याची कल्पना होती.

संबंधित बातम्या : 

Good News | निर्मात्यांची मोठी घोषणा, ‘हे’ चित्रपट होणारा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित!

कंगना रनौतच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता, न्यायालयाने पाठवली नोटीस!

(Photos of Ankita Lokhande and her boyfriend Vicky Jain’s Goa tour have gone viral on social media)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें