VIDEO | हात पकडून अनुष्काने विराटला उचललं, कोहलीच्या तोंडून पटकन निघालं…

अनुष्का विराटला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसते. व्हिडीओत ती एकदाच नाही, तर दोन वेळा विराटला उचलताना दिसते (Anushka Sharma lifts Virat Kohli)

VIDEO | हात पकडून अनुष्काने विराटला उचललं, कोहलीच्या तोंडून पटकन निघालं...
अनुष्का शर्मा पती विराट कोहलीला उचलतानाचा व्हिडीओ व्हायरल
अनिश बेंद्रे

|

Apr 07, 2021 | 2:02 PM

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. अनुष्का नेहमीच कुठलीतरी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. कधी चिमुकल्या वामिकासोबतचे सुंदर फोटो, तर कधी नवरोबा विराट कोहलीसोबत (Virat Kohli) क्वॉलिटी टाईम घालवतानाचे क्षण. यावेळी मात्र अनुष्काचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. अनुष्काने आपल्या Biceps ची ताकद दाखवून दिली आहे. हा व्हिडीओ पाहून विरुष्काचे चाहते तर अवाक झालेच, पण विराटच्या तोंडूनही ‘ओ तेरी’ निघालं. (Actress Anushka Sharma lifts husband Cricketer Virat Kohli Instagram Video goes viral)

काय आहे व्हिडीओ

अनुष्का आणि विराट यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये अनुष्का विराटला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसते. व्हिडीओत ती एकदाच नाही, तर दोन वेळा विराटला उचलताना दिसते. व्हिडीओतून अनुष्काची ‘विराट’ ताकद पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. अनुष्काच्या मसल पॉवरचं कौतुक इन्स्टाग्राम युजर्स करत आहेत.

व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराट यांची छानशी केमिस्ट्री पाहायला मिळते. अनुष्का विराटला पहिल्यांदा उचलताना “तू मला मदत करत आहेस. स्वतःला उचलून घेण्यासाठी जोर लावू नकोस. प्रॉमिस कर” असं दटावताना ऐकू येते. दुसऱ्यांदा ती विराटला आरामात उचलते. यशस्वी होताच ती आपले बळकट स्नायू दाखवत स्वतःलाच शाबासकीची थाप देतानाही दिसते.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, अनुष्का शर्मा पुन्हा एकदा कामावर परतली आहे. नुकतेच एका फोटोशूटसाठी ती बाहेर पडली होती. लेकीच्या जन्माच्या दोन महिन्यांनंतर मार्च अखेरीस तिने पुन्हा शूटींगला सुरुवात केली. यावर्षी जानेवारी महिन्यात अनुष्का-विराटची मुलगी वामिकाचा जन्म झाला. तेव्हापासून ती मातृत्वाचा आनंद घेत होती. अनुष्का मे पासून नव्या प्रोजेक्टसाठी शूट करण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती आहे. तर आधी तिने एका जाहिरातीचे शूटिंग केले.

अनुष्का अखेर 2018 मध्ये ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ देखील होते. सध्या ती टीव्ही जाहिरातींमध्ये व्यस्त आहे. तसेच, भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी यांच्या बायोपिकमध्येही ती झळकण्याची शक्यता वर्वण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

वामिकाच्या जन्मानंतर पुन्हा सेटवर परतली अनुष्का शर्मा, ‘कूल लूक’ पाहून चाहतेही उत्सुक!

(Actress Anushka Sharma lifts husband Cricketer Virat Kohli Instagram Video goes viral)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें