New Wink Sensation | प्रियानंतर पूजा हेगडेनेही मिचकावला ‘डोळा’, काही तासांतच व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ!

पूजाची ही अदा पाहून अनेकांना ‘Wink Sensation’ ठरलेल्या प्रिया प्रकाश वॉरियरची आठवणी आली आहे. पूजाने हा व्हिडीओ केवळ 48 तासांपूर्वी अपलोड केला आहे आणि त्याला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

New Wink Sensation | प्रियानंतर पूजा हेगडेनेही मिचकावला ‘डोळा’, काही तासांतच व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ!
पूजा हेगडे

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेने (Pooja Hegde) तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने आपला लूक तीन वेळा बदलला आहे. तिच्या मेसी लूकपासून ते स्टायलिश लूकपर्यंत सगळ्यातच ती खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर, या व्हिडीओमध्ये तिने प्रियासारखा डोळा मारला आहे (Wink Sensation). पूजा हेगडेचा हा व्हिडीओ पाहून चाहते घायाळ झाले आहे. इतकेच नव्हेतर काही तासांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे (Actress Pooja Hegde becomes New Wink Sensation of internet).

पूजाची ही अदा पाहून अनेकांना ‘Wink Sensation’ ठरलेल्या प्रिया प्रकाश वॉरियरची आठवणी आली आहे. पूजाने हा व्हिडीओ केवळ 48 तासांपूर्वी अपलोड केला आहे आणि त्याला आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि दर तासाला हे लाईक्स खूप वेगवान वाढत आहेत. तीन वर्षांपूर्वी प्रिया प्रकाश वॉरियरने एका चित्रपटात असाच एक सीन देखील केला होता. यामुळे ती रातोरात ‘नॅशनल क्रश’ बनली होती.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

ड्रेसिंग टेबलच्यासमोर बसून पूजाने हा व्हिडीओ बनवला आहे. ज्यामध्ये त्याचा पहिला लूक असा आहे की, तो अगदी झोपेतून उठल्यासारखा वाटत आहे. मग पूजाने एक टर्न घेतला आणि तिचा लुक बदलला ज्यामध्ये तिने मेक-अप देखील केला होता आणि केसही ठीक दिसू लागले होते. त्यानंतर तिने ग्लिटर पार्टी लूक ड्रेस परिधान केला, ज्यात पट्ट्यासारखे बॅकलेस डिझाईन आहे. या हॉट व्हिडीओमध्ये ती शेवटी कॅमेराकडे पाहून डोळा मारते. चाहते तिचा हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत (Actress Pooja Hegde becomes New Wink Sensation of internet).

हृतिकसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण!

अभिनेत्री पूजा हेगडे हिने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीची सुरूवात हृतिक रोशन सोबतच्या ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटातून केली होती. 2009मध्ये तिने ‘मिस इंडिया’ स्पर्धेतही भाग घेतला होता परंतु, ती विजेती होऊ शकली नाही. 2012मध्ये तिने अभिनेता जीवासमवेत ‘मुगामुडी’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले. मग जवळपास दरवर्षी तिचे चित्रपट दक्षिण इंडस्ट्रीत दिसू लागले. अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटामध्येही तिला संधी मिळाली होती.

एका चित्रपटासाठी आकारते ‘इतके’ मानधन

अलीकडेच पूजा हेगडेने आपले मानधन 3 कोटीं इतके वाढवले आहे. दक्षिणात्य चित्रपटांसोबतच ती रणवीर सिंगच्या ‘सर्कस’ आणि सलमानसोबत ‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये दिसणार आहे. चाहते तिच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेता विजयसोबत ‘थलापती 65’ या चित्रपटासाठी तिने 3 कोटी इतकी फी आकारली आहे. प्रभास सोबतच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटातही पूजा हेगडे झळकणार आहे.

(Actress Pooja Hegde becomes New Wink Sensation of internet)

हेही वाचा :

The Bigg Bull | अभिनय क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना जोरदार चपराक, सोशल मीडियावर होतेय अभिषेक बच्चनची वाहवा!

Video | पहिल्यांदाच मातृत्व सुख अनुभवणाऱ्या दिया मिर्झानेही आरोग्यासाठी अवलंबला करीना-अनुष्काचा मार्ग, पाहा खास व्हिडीओ…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI