Video | ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री, मेरे ड्रीम मे तेरी एंट्री’, ‘कोव्हिशिल्ड’ घेताना राखीने केलं नव्या गाण्याचं प्रमोशन, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री राखी सावंतने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रुग्णालयात बसलेली दिसत आहे. जिथे तिने कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. पण इंजेक्शन घेताना राखी खूप घाबरली होती.

Video | ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री, मेरे ड्रीम मे तेरी एंट्री’, ‘कोव्हिशिल्ड’ घेताना राखीने केलं नव्या गाण्याचं प्रमोशन, पाहा व्हिडीओ
राखी सावंत
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jun 17, 2021 | 4:36 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) आजकाल सतत चर्चेत येत असते. तिला बर्‍याचदा मुंबईत स्पॉट केले जाते. अशातच आता अभिनेत्रीचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री कोरोना लस टोचून घेताना दिसत आहे. या लसीचा एक डोस घेत असताना अभिनेत्री तिच्या आगामी म्युझिक व्हिडीओबद्दल बोलताना दिसली. ज्यामुळे तिची ही लस टोचून घेण्याची शैली तिच्या चाहत्यांना खूप मजेशीर वाटली आहे. यामुळेच आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Actress Rakhi Sawant singing her upcoming song while taking covisheild first dose).

अभिनेत्री राखी सावंतने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रुग्णालयात बसलेली दिसत आहे. जिथे तिने कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. पण इंजेक्शन घेताना राखी खूप घाबरली होती. यावेळी ती सतत तिच्या नवीन गाण्याचे प्रमोशन करत होती. राखी सावंत यांच्या नवीन गाण्याचे नाव आहे ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री, मेरे ड्रीम मे तेरी एंट्री’, जे गाणे ती सतत गात होती. त्याने या व्हिडीओमधील नर्सला विचारले की, लस घेताना मला काही त्रास होणार नाही ना? दरम्यान, ती सतत तिच्या नवीन गाण्याचे प्रमोशन करत होती.

पाहा राखीचा व्हिडीओ

राखीचे चाहते तिच्या या व्हिडीओवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. राखी सावंतचा जुना मित्र विंदू दारा सिंगनेही अभिनेत्रीच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे की, “कोव्हिशील्डची एन्ट्री तुझ्या हातात झाली आहे” तर, राखी सावंतच्या इतर चाहत्यांनी “राखी तू लाजवाब आहेस”, अशा कमेंट केल्या आहेत. दरम्यान, राखी सावंतने तिच्या नवीन गाण्याचा छोटासा टीझरही रिलीज केला आहे. या गाण्यात अभिनेत्रीची अतिशय हॉट स्टाईल पाहायला मिळत आहे. राखीची हटके अदा पाहून तिचे चाहते उत्सुक झाले आहेत. अभिनेत्रीचा हा खास व्हिडीओ तुम्ही देखील पाहिलाच पाहिजे…

पाहा व्हिडीओ :

(Actress Rakhi Sawant singing her upcoming song while taking covisheild first dose)

हेही वाचा :

Samantar 2 | दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य! काय घडणार कुमारच्या आयुष्यात? पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त टीझर

‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री प्रियमणी विद्या बालनची बहीण, एकमेकींच्या बाँडिंगबद्दल सांगताना म्हणाली…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें