Samantar 2 | दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य! काय घडणार कुमारच्या आयुष्यात? पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त टीझर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Harshada Bhirvandekar

Updated on: Jun 17, 2021 | 1:59 PM

पहिल्या सीझन शेवट असा होता, जिथे कुमारचे भविष्य स्पष्ट दिसत होते. त्यामुळे साहजिकच समीर विध्वंस दिग्दर्शित 'समांतर 2' ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती, ती यात आता पुढे काय पाहायला मिळणार याची. ही उत्सुकता अधिक न ताणता एमएक्स प्लेअरने 'समांतर 2'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

Samantar 2 | दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य! काय घडणार कुमारच्या आयुष्यात? पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त टीझर
समांतर 2

मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘समांतर’ने (Samantar 2) प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. पहिल्या सीझनमध्ये स्वप्नील जोशीने (कुमार महाजन) नितेश भारद्वाजचा (सुदर्शन चक्रपाणी) शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती (Swapnil Joshi and Tejaswwini Pandit starrer web Series Samantar 2 teaser launch).

पहिल्या सीझन शेवट असा होता, जिथे कुमारचे भविष्य स्पष्ट दिसत होते. त्यामुळे साहजिकच समीर विध्वंस दिग्दर्शित ‘समांतर 2’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती, ती यात आता पुढे काय पाहायला मिळणार याची. ही उत्सुकता अधिक न ताणता एमएक्स प्लेअरने ‘समांतर 2’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

पाहा जबरदस्त टीझर :

दोन व्यक्ती, एका आयुष्यात दोन वेगळ्या काळात सारख्याच नशिबाचा सामना करत आहेत. सुदर्शन चक्रपाणीचा भूतकाळ कुमारचा भविष्यकाळ ठरवू शकेल?, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी मराठी एमएक्स ओरिजिनल ‘समांतर 2’चा ट्रेलर 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

सुदर्शन चक्रपाणीची पुढची कथा…

‘समांतर’ सीरीजच्या पहिल्या पर्वात अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत दिसला होता. तर, त्याच्यासोबत अभिनेत्री तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. या वेब सीरीजच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर कृष्णाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले दिन अभिनेते अर्थात स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज हे कलाकार एकत्र काम करताना पाहायला मिळाले होते.

सुदर्शन चक्रपाणीच्या शोधात असलेला कुमार महाजन आणि त्याला भेटल्यानंतर कुमार महाजनच्या आयुष्यात काय घडते, हे पहिल्या पर्वात पाहायला मिळाले होते. मात्र, आता दुसऱ्या पर्वात ही कथा पुढे जाताना दिसणार आहे. या सीरीजच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्नील जोशीसह इतर आणखी कोणती नवी पात्र पाहायला मिळतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

‘समांतर 2’ च्या चित्रीकरणाची सुरुवात झाल्यानंतर आता ही वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लॉकडाऊनच्या आधी या वेब सीरीजचे पहिले पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या वेब सीरीजद्वारे स्वप्नील जोशीने वेब विश्वात पदार्पण केले होते. या पहिल्याच पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच दुसरे पर्वही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरतेय का, हे सीरीज प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे.

(Swapnil Joshi and Tejaswwini Pandit starrer web Series Samantar 2 teaser launch)

हेही वाचा :

PHOTO | ‘सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊत प्रेमात, पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती…

PHOTO | पत्नी सुनिता आहुजाच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलं कुटुंब, पाहा गोविंदाचे ‘फॅमिली’ फोटो

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI