AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘समांतर २’ वेब सीरीजच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, पाचगणी येथे चित्रीकरणास सुरूवात!

'समांतर’ वेबसीरीजच्या पहिल्या सिझनच्या यशानंतर वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे.

‘समांतर २’ वेब सीरीजच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, पाचगणी येथे चित्रीकरणास सुरूवात!
| Updated on: Dec 23, 2020 | 7:10 PM
Share

मुंबई : ‘समांतर’ (Samantar) वेबसीरीजच्या पहिल्या सिझनच्या यशानंतर वेबसीरीजच्या दुसऱ्या सिझनची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे. या सीरीजचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरू आहे. नुकतेच या वेब सीरीजमधील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ या चित्रीकरणासाठी एकत्र आले होते. या वेब सीरीजचे दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. (Filming begins at Pachgani of ‘Samantar-2’ web series)

अर्जुन सिंह बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जीसिम्स’ची (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अंड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)निर्मिती असलेल्या ‘समांतर’च्या पहिल्या सिझनला तब्बल 200 दशलक्ष हिट्स मिळाले होते आणि तो एक विक्रम मानला जातो. सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत नितीश भारद्वाज आहे. स्वप्निल जोशीची कुमार महाजनची भूमिका रसिकांनी डोक्यावर घेतली होती.

दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरु आहे. या चित्रीकरणात नुकतेच स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित आदी कलाकार सहभागी झाले होते. दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर यावेळी निर्माते अर्जुन सिंह बरान आणि कार्तिक डी निशाणदारसुद्धा हजर होते. या सर्वांना पहिल्या सिझनप्रमाणेच दुसरे सिझन देखील अत्यंत लोकप्रिय ठरेल, असा विश्वास आहे.

सुदर्शन चक्रपाणीची पुढची कथा…

सुदर्शन चक्रपाणीच्या शोधात असलेला कुमार महाजन आणि त्याला भेटल्यानंतर कुमार महाजनच्या आयुष्यात काय घडते, हे पहिल्या पर्वात पाहायला मिळाले होते. मात्र, आता दुसऱ्या पर्वात ही कथा पुढे जाताना दिसणार आहे. या सीरीजच्या दुसऱ्या पर्वामध्ये स्वप्निल जोशीसह इतर आणखी कोणती नवी पात्र पाहायला मिळतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

‘समांतर’ या वेब सीरीजच्या दुसऱ्या पर्वाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस करत आहेत. तेव्हा आता या दुसऱ्या सिझनमध्ये काहीतरी वेगळेपणही पाहायला मिळणार आहे. सोशल मीडिया चित्रीकरण सुरू झाल्याचे म्हणत एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ‘आणि अशाप्रकारे ‘समांतर २’चं चित्रीकरण सुरू झालंय. लवकरच घेऊन येतोय तुमच्या भेटीला!!’, असे कॅप्शन देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या : 

बंद पडणाऱ्या ‘सावित्रीजोती’साठी पुढे सरसावले ऊर्जामंत्री, मालिकेला अनुदान देण्याची मागणी!

(Filming begins at Pachgani of ‘Samantar-2’ web series)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.