Sonam Kapoor | सोनम कपूर हिने ट्विट करत मुंबईच्या रस्त्याची केली पोलखोल, म्हणाली नेमकं चाललंय?

कित्येक दिवसांपासून चाहते सोनम कपूर हिच्या पुनरागमनाची वाट पाहात आहेत. सोनम मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sonam Kapoor | सोनम कपूर हिने ट्विट करत मुंबईच्या रस्त्याची केली पोलखोल, म्हणाली नेमकं चाललंय?
| Updated on: Jan 14, 2023 | 6:43 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अनिल कपूर याची लाडकी लेक आणि अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिने २०२२ मध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोनम कपूर हिने आपल्या मुलाचे नाव देखील चाहत्यांना सांगून टाकले असून सोनम हिने मुलाचे नाव वायु असे ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. २०१९ मध्ये सोनम कपूर हिचा शेवटचा चित्रपट (Movie) चाहत्यांच्या भेटाला आला होता. २०२३ मध्ये ब्लाइंड हा चित्रपट सोनमचा रिलीज होऊ शकतो. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते सोनम कपूर हिच्या पुनरागमनाची वाट पाहात आहेत. जरी सोनम मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात कायम असते.

आता अनिल कपूर यांची लेक तिच्या एका ट्विटमुळे चर्चेत आलीये. सोनम कपूर हिने एक ट्विट शेअर करत मुंबईच्या वाहतूककोंडीच्या समस्येवर सर्वांचे लक्ष वेधले आहे. इतकेच नाहीतर तिने मुंबईच्या रस्त्याबाबत देखील मोठे भाष्य केले आहे. सोनम कपूर हिने मुंबईमध्ये गाडी चालवणे किती अवघड आहे हे देखील म्हटले आहे.

सोनम कपूर हिने ट्विटमध्ये म्हटले की, मुंबईमध्ये गाडी चालवणे खूप अवघड आहे…बँडस्टँडवरून जुहूला पोहोचायला मला तब्बल एक तास लागला… जागोजागी बांधकाम सुरू असून मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत…प्रदूषण खूप जास्त आहे…काय चाललंय हे नेमकं…

आता सोनम कपूर हिचे हेच ट्विट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या ट्विटवर कमेंट केल्या आहेत. एका युजर्सने म्हटले, फक्त जुहूमध्येच नाहीतर संपूर्ण मुंबई शहराची हिच स्थिती आहे.

दुसऱ्या युजर्सने म्हटले, संपूर्ण मुंबईमध्येच मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत…एकाने लिहिले की, दिल्लीमध्ये जी स्थिती आहे तिच मुंबईमध्ये होत आहे. एका दुसऱ्या युजर्सने लिहिले, शहराचा विकास होत आहे…जरा धीर धरा…

आनंद आहूजा याच्यासोबत लग्न केल्यापासून सोनम कपूर ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. सोनम कपूरच्या मुलाची झलक पाहण्यास चाहते आतुर आहेत. मात्र, अजूनही सोनम कपूर हिने आपल्या मुलाचा चेहरा दिसू दिलेला नाहीये.