AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरीन खान हिने सलमान खान याचे नाव घेत केला मोठा खुलासा, म्हणाली, इंडस्ट्रीत येणे अवघड

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा बहुचर्चित चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटातून पलक तिवारी हिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. जरीन खान हिने आता सलमान खान याच्याबद्दल मोठे विधान केले आहे.

जरीन खान हिने सलमान खान याचे नाव घेत केला मोठा खुलासा, म्हणाली, इंडस्ट्रीत येणे अवघड
| Updated on: May 14, 2023 | 3:24 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री जरीन खान (Zareen Khan) हिचा आज वाढदिवस आहे. जरीन खान हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे ती चर्चेत आलीये. या मुलाखतीमध्ये जरीन खान हिने सलमान खान याच्याबद्दल मोठे विधान केले आहे. जरीन खान हिने थेट सांगितले की, मी कधीच ज्या गोष्टींचा विचार केला नव्हता, त्या गोष्टी फक्त आणि फक्त सलमान खान (Salman Khan) याच्यामुळेच झाल्या आहेत. सलमान खान याने जरीन खान हिला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले आहे. सलमान खान याने फक्त जरीन खान हिचा नाही तर आतापर्यंत अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींना लाॅन्च केले आहे. नुकताच त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून त्याने पलक तिवारी आणि शहनाज गिल यांना बाॅलिवूडमध्ये (Bollywood) लाॅन्च केले.

जरीन खान म्हणाली की, मी कधीच विचार केला नव्हता मला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. मात्र, हे फक्त सलमान खान याच्यामुळे शक्य झाले. मला बाॅलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी अजिबात संघर्ष करावा लागला नाही. हा पण बाॅलिवूडमध्ये आल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागल्या. मला चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी सलमान खान याचा आभारी आहे.

जरीन खान हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. हाऊसफुल 2′, ‘रेडी’ आणि ‘हेट स्टोरी 3 या चित्रपटाच्यामध्येही जरीन खान हिने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. जरीन खान ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. जरीन खान ही नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.

विशेष म्हणजे सोशल मीडियावर देखील जरीन खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग दिसते. सलमान खान याने कतरिना कैफ हिला देखील बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले आहे. नुकताच श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिला सलमान खान याने बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले आहे. मात्र, अनेकांना पलक तिवारी हिचा अभिनय फार काही आवडला नाहीये.

विशेष म्हणजे किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील पलक तिवारी ही दिसली होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही पलक ही सोशल मीडियावर सक्रिय असून सतत बोल्ड फोटो शेअर करताना पलक तिवारी ही दिसत आहे. शहनाज गिल ही देखील सलमान खान याच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे. बिग बाॅसपासून शहनाज गिल हिला खरी ओळख ही मिळाली आहे.

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?