AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan : 5 हजार कोटीची संपत्ती, पण सैफ कंगाल झालेला, ही माहित नसलेली आयुष्याची दुसरी बाजू

Saif Ali Khan : सैफ अली खान नवाबांच्या कुटूंबातून येतो. आज वारसा हक्काने आलेली त्याच्याकडे 5 हजार कोटींची संपत्ती आहे. पण आयुष्यात एकवेळी अशी सुद्धा आलेली, जेव्हा सैफ अली खान कंगाल झालेला. त्याच्याकडे पैसा नव्हता. सैफ अली खानने आज जे ऐश्वर्य मिळवलय ते खरोखरच कौतुकास्पद आहे. सैफवर अशी वेळ का आली? त्याने हे सर्व पुन्हा कसं उभारलं? त्याबद्दल जाणून घ्या.

Saif Ali Khan :  5 हजार कोटीची संपत्ती, पण सैफ कंगाल झालेला, ही माहित नसलेली आयुष्याची दुसरी बाजू
सैफ अली खानवर हल्ला, नेक सेलिब्रिटींना धक्का,
| Edited By: | Updated on: Jan 18, 2025 | 10:58 AM
Share

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान नवाबांच्या कुटूंबातून येतो. आज वारसा हक्काने आलेली त्याच्याकडे 5 हजार कोटींची संपत्ती आहे. त्याशिवाय त्याचा स्वत:चा ‘हाऊस ऑफ पटौदी’ नावाचा ब्रांड आहे. 2018 साली त्याने हा व्यवसाय सुरु केला. सैफ अली खानची स्वत:ची 1300 कोटींची संपत्ती आहे. सैफकडे आज प्रचंड पैसा, आलिशान घर, Cars आहेत. पण याच सैफ अली खानवर घटस्फोटानंतर अमृता सिंहला पोटगीची रक्कम देताना चांगलेच नाकीनऊ आलेले. 1991 साली सैफ अली खानने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अमृता सिंह बरोबर लग्न केलं. अमृता सिंहपासून त्याला दोन मुलं आहेत. सारा अली खान (1995) आणि इब्राहिम अली खान (2001). लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफ अली खान आणि अमृता सिंहने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

या घटस्फोटामुळे सैफ अली खानच व्यक्तीगत आयुष्य ढवळून निघालं होतं. पोटगीपोटी त्याला प्रचंड रक्कम द्यावी लागली होती. 2005 साली टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत सैफने अनेक गोष्टींचा खुलासा केलेला. “मला अमृताला 5 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्यातले 2.5 कोटी रुपये मी दिले आहेत. त्याशिवाय माझा मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत मला महिन्याला 1 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. मी शाहरुख खान नाहीय. माझ्याकडे तितका पैसा नाहीय. मी सर्व पैसे देईन असा मी तिला शब्द दिलाय आणि मी देईन” असं सैफने या मुलाखतीत सांगितलेलं.

‘अमृता माझ्या आयुष्याचा भाग राहील’

अमृतासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफ कंगाल झाला होता. त्याच्याकडे जे काही होतं ते त्यांना मुलांना आणि अमृताला देऊन टाकलेलं. इतकं सगळं होऊनही अमृता माझ्या आयुष्याचा भाग राहील असं सैफ अली खान म्हणालेला. “जाहीराती, स्टेज शो आणि चित्रपटांमधून जो पैसा मिळायचा तो सगळ मुलांना देत होता. माझ्याकडे पैसा नाहीय. माझा बंगला अमृता आणि मुलांसाठी होता. मला तिच्याबद्दल काही तक्रार नाहीय. पण ती आणि मुलं माझ्या आयुष्याचा भाग राहतील. माझ्या मुलांनी आणि तिने आनंदी रहावं एवढीच माझी इच्छा आहे” असं सैफ या मुलाखतीत म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.