AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raksha Bandhan | ‘रक्षाबंधन’मध्ये अनोख्या अंदाजात दिसणार अक्षय कुमार, बहिणीच्या नावे पोस्ट लिहित म्हणाला..

अक्षयच्या आगामी ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक माहिती चाहत्यांसमोर येत आहे. अक्षयने त्याच्या चाहत्यांना माहिती देताना सांगितले की, आजपासून त्याने ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

Raksha Bandhan | ‘रक्षाबंधन’मध्ये अनोख्या अंदाजात दिसणार अक्षय कुमार, बहिणीच्या नावे पोस्ट लिहित म्हणाला..
अक्षय कुमार
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 2:41 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’  अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. अक्षयने आपल्या कारकिर्दीतील एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. खिलाडी कुमार वेगवेगळ्या विषयावर आधारित चित्रपट करण्याला प्राधान्य देतो. अशा परिस्थितीत, आता अक्षयने बहिणींसाठी ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) चित्रपटाची खास भेट आणली आहे. या चित्रपटात अक्षय पुन्हा नव्या स्टाईलमध्ये दिसणार आहे (Akshay Kumar upcoming movie Raksha Bandhan new Update actor wrote post for sister alka).

अक्षयच्या आगामी ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक माहिती चाहत्यांसमोर येत आहे. अक्षयने त्याच्या चाहत्यांना माहिती देताना सांगितले की, आजपासून त्याने ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

बहिणीच्या नावे खिलाडी कुमारची पोस्ट

या चित्रपटाच्या शुटिंगच्या सुरूवातीसंदर्भात माहिती देण्याबरोबरच अक्षयने आपली बहीण अलकाच्या नावाने एक खास संदेश लिहिला आहे. अभिनेत्याने चाहत्यांना सांगितले की, आज चित्रपटाच्या सेटवर त्याचा पहिला दिवस आहे. अभिनेत्याने असे लिहिले की, आपल्या बहिणीबरोबर मोठे होत असताना अलका हीच माझी पहिली मैत्रीण होती. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. आनंद एल राय यांचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट तिला समर्पित आहे आणि आमच्या या खास बाँडचे सेलिब्रेशन आहे. आज शूटिंगचा पहिला दिवस आहे,  तुमचे प्रेम आणि शुभेच्छा द्या.’

यासह अक्षयने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे. अक्षयचा फोटोमधील लूक तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करू शकतो. अभिनेता पिवळ्या रंगाचा कुर्ता घालून आपल्या कपाळावर टिळा लावलेला दिसत आहे.

पाहा अक्षयची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षयची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे. यासोबतच चित्रपटाचे पोस्टरही समोर आले असून, यामध्ये अक्षय 4 बहिणींनी सोबत दिसला आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की, हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात भाऊ आणि बहिणीचे सुंदर नाते चाहत्यांसमोर सादर केले जाईल.

अक्षयसोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षात हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. रक्षबंधन हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याची अद्याप्न अधिकृत घोषणा झालेली नाही.

(Akshay Kumar upcoming movie Raksha Bandhan new Update actor wrote post for sister alka)

हेही वाचा :

लेक सुहानाची ‘फादर्स डे’ पोस्ट पाहून शाहरुख खान झाला भावूक, प्रतिक्रिया देताना म्हणाला…

World Music Day 2021 | बॉलिवूडच्या ‘या’ दमदार गाण्यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, आवर्जून ऐका ‘ही’ लोकप्रिय गाणी!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.