Akshay Kumar: “राजकारणात प्रवेश करणार का?”, अक्षय कुमार म्हणतो..

आनंद एल. राय दिग्दर्शित रक्षाबंधन हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अक्षयचा 'सेल्फी' हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये त्याच्यासोबत इम्रान हाश्मी, नुशरत भरुचा आणि डायना पेंटी यांच्या भूमिका आहेत.

Akshay Kumar: राजकारणात प्रवेश करणार का?, अक्षय कुमार म्हणतो..
Akshay KumarImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 10:33 AM

‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) लंडनमध्ये त्याच्या कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय राजकारणात प्रवेश करण्याविषयी व्यक्त झाला. चित्रपटांमध्ये काम करत आणि सामाजिक समस्या असलेल्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आनंदी असल्याचं अक्षयने यावेळी सांगितलं. अक्षयचा रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून हुंड्यासारख्या समस्येवर भाष्य करण्यात आलं आहे. राजकारण प्रवेश करण्यापेक्षा मी चित्रपटांतूनच सामाजिक समस्या अधोरेखित करून त्यावर उपायही शोधत असल्याचं अक्षयने स्पष्ट केलं.

काय म्हणाला अक्षय कुमार?

“मी चित्रपट निर्मितीत खूप आनंदी आहे. एक अभिनेता म्हणून मी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शक्य तेवढं काम करतो. आतापर्यंत मी 150 चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा चित्रपट म्हणजे ‘रक्षाबंधन’. मी अनेकदा व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करतो, तर कधी सामाजिक विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. मी वर्षातून तीन-चार चित्रपटांची निर्मिती करतो. चित्रपट करत असताना मी फक्त समस्येवर बोलत नाही तर त्यावर मी उपायसुद्धा शोधतो. ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उपाय सांगितला आहे. त्याचप्रमाणे रक्षाबंधन या चित्रपटातसुद्धा हुंडासारख्या समस्येवर उपाय सांगण्यात आला आहे. आपण आणि आपल्या समाजाने काय केलं पाहिजे याचं उत्तर त्यात आहे”, असं अक्षयने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

आनंद एल. राय दिग्दर्शित रक्षाबंधन हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अक्षयचा ‘सेल्फी’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये त्याच्यासोबत इम्रान हाश्मी, नुशरत भरुचा आणि डायना पेंटी यांच्या भूमिका आहेत. जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूचासोबत त्याचा ‘रामसेतू’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित होणार आहे. ‘मिशन सिंड्रेला’, ‘ओएमजी 2’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे अक्षयचे चित्रपटसुद्धा आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.